12 December 2024 3:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

IRCON Share Price | इरकॉन इंटरनॅशनल शेअर्समध्ये बंपर खरेदी, रोज अप्पर सर्किटवर आदळतोय, नेमकं कारण काय?

IRCON Share Price

IRCON Share Price | इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. मागील 10 दिवसात इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 2 मोठ्या वर्क ऑर्डर देण्यात आल्या आहेत. या वर्क ऑर्डरचे मूल्य 80 कोटींपेक्षा जास्त आहे.

ही बातमी शेअर बाजारात पसरताच गुंतवणूकदारांनी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली. इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपये पेक्षा कमी आहे. आज बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 6.64 टक्के वाढीसह 97.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

25 जुलै 2023 रोजी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीत कळवले आहे की, दक्षिण पूर्व रेल्वेने कंपनीला 80 कोटी रुपये मूल्याचे एक कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. कंपनीला या ऑर्डर अंतर्गत पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण व्यवस्था, विद्युतीकरण संबंधित काम करायचे आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला 18 महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीचे शेअर 1.95 टक्क्यांच्या घसरणीसह 91 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15.25 टक्के नफा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 160.32 टक्के परतावा कमावून दिला आहे. 17 जुलै रोजी इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीला जिरीबाम आणि इंफाळ दरम्यानच्या नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम मिळाले होते. ज्याचे मूल्य 144 कोटी रुपये आहे. कंपनीला हे काम पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| IRCON Share Price today on 26 July 2023

हॅशटॅग्स

IRCON Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x