
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. नुकताच या आयटी कंपनीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी 500 दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो स्टॉक 5.46 टक्के वाढीसह 486.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 10 जून 2024 रोजी विप्रो स्टॉक 1.77 टक्के घसरणीसह 475.95 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( विप्रो कंपनी अंश )
टेक्निकल सेटअपवर विप्रो स्टॉकने 460 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. जर हा स्टॉक 450 रुपये किमतीच्या खाली आला तर शेअर 400 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकमध्ये 500 रुपये किमतीवर प्रतिकार पाहायला मिळत आहे. जैनम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉक डिसेंबरपर्यंत 550-600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 400 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकला 500 रुपये किमतीवर प्रतिकार मिळत आहे. जर हा स्टॉक 493 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर 505 रुपये आणि 532 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांच्या मते, या स्टॉकने 470 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे.
एंजल वन फर्मच्या तज्ञाच्या मते, विप्रो स्टॉकमध्ये 460 रुपये किमतीवर सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर 490 रुपये किमतीवर रेझिस्टन्स पाहायला मिळत आहे. तज्ञांच्या मते, पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 450 रुपये ते 520 रुपये दरम्यान असेल. मार्च 2024 पर्यंत विप्रो कंपनीच्या प्रवर्तकांकडे कंपनीचे 72.89 टक्के भाग भांडवल होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.