9 October 2024 3:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, मालामाल करणार हा स्टॉक - Marathi News Gold Rate Today | खुशखबर! सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Marathi News Pension Life Certificate | डोअरस्टेप बँकिंग सर्विसच्या माध्यमातून जमा करा 'लाईफ सर्टिफिकेट', घरबसल्या होईल काम IPO GMP | पैसे तयार ठेवा, सर्वात मोठा IPO लाँच होतोय, ₹13720 मध्ये मिळेल 1 लॉट, संधी सोडू नका - Marathi News Singham Again Trailer | 'एक वचन के लिए वो लंका जलाने वाला है', 'सिंघम अगेन' मध्ये पाहायला मिळणार रामायणची झलक BEL Share Price | मल्टिबॅगर PSU BEL शेअर पुन्हा रॉकेट होणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - Marathi News Aditya Birla Mutual Fund | म्युच्युअल फंड योजना असावी तर अशी, महिना 3200 बचतीवर मिळेल 1 कोटी रुपये परतावा
x

PPF Investment | दर महिना बचतीवर मॅच्युरिटीला मिळतील 16 लाखा रुपये, या सरकारी योजनेत बिंधास्तपणे पैसे गुंतवा

PPF Investment

PPF Investment | नोकरी पेशा असलेल्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीच्या अनेक स्किम सरकारमार्फत उपलब्ध केल्या आहेत. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा लाभ घेताना देखील दिसतात. अशीच एक पीपीएफ इन्वेस्टमेंट आहे. ज्यामध्ये तुम्ही प्रत्येक महिन्याला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून तब्बल 16 लाखांचे मानकरी होऊ शकता. पीपीएफ फंड नेमका काय आहे ? यामध्ये पैसे गुंतवण्याची नेकमी तरतूद काय असणार आहे ? जाणून घ्या सर्व सविस्तर माहिती.

पीपीएफ म्हणजे काय?
पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉविडेंट फंड. हि एक सरकारी स्किम असून यामध्ये गुंतवणूकदार कोणत्याही गरोष्टीची शंका न बाळगता आपले पैसे गुंतवू शकतो. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी एक वर्षाने 7.1 टक्केच्या व्याजदराने सूट दिली जाते. त्याचबरोबर गुंतवणूकदार एका फायनान्शियल इयरमध्ये दिड लाखांपर्यंत पैशांची गुंतवणूक करू शकतो. सोबतच पीपीएफ खात्यामध्ये जमा केली गेलेली रक्कम एकूण पंधरा वर्षानंतर मेच्योर होते. त्यामुळे सरकारमार्फत असलेल्या या पीपीएफ फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करून गुंतवणूकदाराला फायदाच होऊ शकतो.

महत्वाची गोष्ट म्हणते EEE या कॅटेगिरीनुसार कोणताही इन्वेस्टर फक्त दिड लाख रुपये एवढी अमाऊंट एका वर्षामध्ये इन्वेस्ट करू शकतो. या पैशांमध्ये मिळणाऱ्या मेच्योरीटीवर आणि व्याजावर टॅक्स बेनिफिट देखील मिळते.

पीपीएफमध्ये इन्वेस्ट केल्यावर मिळतो बक्कळ पैसा. कसा ? जाणून घ्या.
साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जर गुंतवणूकदाराने दिर्घकाळासाठी पीपीएफ स्किम निवडली आणि प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये खात्यात जमा केले तर, वर्षाची 60,000 एचढी अमाऊंट जमा होते. जर तुम्ही ही गुंतवणूक पुढील पंधरा वर्षांपर्यंत सातत्याने चालू ठेवली तर, तुमच्या खात्यामध्ये एकूण 9 लाख रुपये जमा होतील. दरम्यान पीपीएफ स्किममध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षाच्या हिशोबाने 7.1 टक्क्यांच्या व्याजदराने रिटन दिला जातो. तर, पंधरा वर्षाच्या गुंतवणूकिमध्ये फक्त व्याजाचीच रक्कम 7,27,284 एवढी जमा होते. अशातच जर फायनल अमाऊंटचा विचार केला तर तुमच्या खात्यात तब्बल 16,27,284 एवढी रक्कम जमा होईल आणि हे तुमचे हक्काचे पैसे असतील. सोबतच पीपीएफ हि स्किम सरकारी असल्यामुळे तुमचे पैसे डुबण्याची देखील शक्यता नाही.

मॅच्युरिटी पिरेडमध्ये पैसे काढल्यास चार्जेस घेतले जातात :
खात्यामध्ये जमा असलेली रक्कम मॅच्युरिटी पिरेड होण्याआधीच रक्कम काढून घेत असेल तर, त्यावर चार्जेस लावले जातात. यामध्ये डिपॉजीट केल्यावर पैशांवर 1 टक्के व्याजाची रक्कम कापून पैसे दिले जातात.

प्रीमॅच्युअर क्लोजर बद्दल जाणून घ्या
पीपीएफ खात्यामध्ये पैसे गुंतवणूकदाराला जर अकाऊंट बंद करायचं असेल तर, लगेचच अकाऊंट बंद केलं जात नाही. यासाठी तुम्हाला वाच वर्ष थांबावं लागतं. हे पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत तूम्ही पीपीएफ लोन घेऊ शकता. परंतु खात बंद करण्याची परमिशन दिली जात नाही. जर तुम्हाला हे अकाऊंट बंद करायचं असेल तर यासाठी ठोस कारण देखील लागतात. नेमकी कोणती कारणं लागतात ? पाहूया.

* स्व शिक्षणासाठी किंवा मुलांच्या उच्च शिक्षणामरिता पैसे खर्च करण्यासाठी.
* गुंतवणूकदाराला किंवा त्याच्या घरामधील संबंधित व्यक्तींना मोठा आजार झाला असेल तर, उपचारासाठी 15 वर्षांच्या आत अकाऊंट बंद केलं जाऊ शकत.
* जर इन्वेस्टर निधन पावले तर, पैशांसाठी हे खातं बंद केलं जाऊ शकतं. या कारणसाठी पाच वर्षांचा नियम लागू होत नाही.

News Title : PPF Investment Scheme Benefits check details 02 September 2024.

हॅशटॅग्स

#PPF Investment(65)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x