
Wipro Share Price | विप्रो या बेंगळुरू स्थित दिग्गज आयटी कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या डिसेंबर 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर-डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात तिमाही-दर-तिमाही आधारे 2.7 टक्क्यांची घट होण्याची शक्यता आहे. मागील तिमाहीत विप्रो कंपनीच्या उत्पन्नात 2 टक्क्यांची घट पाहायला मिळाली होती.
या तिमाहीत कंपनीचे मार्जिन 16.1 टक्क्यांवरून घसरून 15.2 टक्क्यांवर येण्याची शक्यता आहे. याशिवाय विप्रो कंपनीचा नफा देखील कमी होऊ शकतो. आज शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी विप्रो स्टॉक 3.97 टक्के वाढीसह 466 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
या तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल तिमाही-दर-तिमाही आधारे 4 टक्क्यांच्या घसरणीसह 22,408 कोटी रुपयेवर जाऊ शकतो. तर कंपनीचा निव्वळ नफा तिमाहीत तिमाही-दर-तिमाही आधारावर 9 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह 2456 कोटी रुपयेवर येऊ शकतो. ऑक्टोबर-डिसेंबर 2023 या कालावधीत विप्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत 13 टक्क्यांनी वाढली आहे. मागील एका वर्षात विप्रो स्टॉक 15 टक्क्यांनी मजबूत झाला आहे.
डिसेंबर तिमाहीपर्यंत विप्रो कंपनीचा एकत्रित नफा 2667 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी 2649 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर कंपनीचे एकत्रित उत्पन्न 22516 कोटी रुपये आहे, जे मागील वर्षी 22540 कोटी रुपये नोंदवले गेले होते. कमाईचे आकडे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमकुवत होते.
या तिमाहीत तज्ञाकडून विप्रो कंपनीचे उत्पन्न 22760 कोटी रुपये राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विप्रो कंपनीने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत आपल्या डॉलरमधील महसुल संकलनात 2.5 टक्क्यांची घट नोंदवली आहे. कंपनीचा EBITA देखील एक टक्क्यांनी घसरला आहे. तर दुसरीकडे कंपनीचे मार्जिन सुधारले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.