 
						Wipro Share Price | विप्रो कंपनीने नुकताच आपले चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळे विप्रो स्टॉक अफाट तेजीत वाढत आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा नफा YOY आधारे 12 टक्के घसरणीसह 2,694 कोटी रुपये नोंदवला वेळा आहे. आणि डिसेंबर 2023 तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल संकलन 4.4 टक्के घसरणीसह 22205 कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
डिसेंबर 2023 तिमाहीच्या आर्थिक निकालासह विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या गुंतवणुकदारांना 1 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. हा अंतरिम लाभांश 10 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यापूर्वी शेअरधारकांच्या खात्यात जमा केला जाईल. शुक्रवार दिनांक 12 जानेवारी 2024 रोजी विप्रो स्टॉक 3.97 टक्के वाढीसह 466 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
तिमाही आधारावर पाहिल्यास विप्रो कंपनीचा महसूल 1.4 टक्के घसरला आहे, मात्र कंपनीचा नफा 1.8 टक्के वाढला आहे. डिसेंबर 2023 मध्ये पर्यंत म्हणजेच चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत विप्रो कंपनीचा महसूल 0.4 टक्के वाढून 67,552 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. आणि या नऊ महिन्यात कंपनीचा निव्वळ नफा जवळपास 1 टक्के घसरला असून 8211 कोटी रुपयेवर आला आहे. विप्रो कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत पुन्हा एकदा घट केली आहे.
विप्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सलग पाचव्या तिमाहीत घट करण्यात आली आहे. जुलै-डिसेंबर 2023 या तिमाहीत मागील तिमाहीच्या तुलनेत 4,473 कर्मचारी कमी झाले होते. सध्या विप्रो कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 240,234 वर आली आहे.
मागील बारा महिन्यांच्या कालावधीत विप्रो कंपनीमधील अॅट्रिशन रेट 14.2 टक्के होता. तर मागील तिमाहीत हा दर 15.5 टक्के नोंदवला गेला होता. विप्रो कंपनी आपले ऑपरेशन कौशल्ये सुधारण्यावर अधिक भर देत आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदार देखील या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याबाबत उत्सुक पाहायला मिळत आहेत.
विप्रो कंपनीने डिसेंबर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले, आणि आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवारी विप्रो स्टॉकने उसळी घेतली. शुक्रवारी विप्रो कंपनीचे शेअर्स 3.88 टक्के वाढीसह 465.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
ट्रेडिंग दरम्यान विप्रो स्टॉक 469 रुपये किमतीवर पोहचला होता. सध्या विप्रो स्टॉक 483 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीजवळ ट्रेड करत आहे. 1 जानेवारी 2024 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 483.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		