 
						Wipro Share Price | विप्रो या आयटी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या दिग्गज कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. काही ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकची टार्गेट प्राइस कमी केली आहे. 23 एप्रिल रोजी विप्रो स्टॉक 0.11 टक्के घसरणीसह 461.50 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 545.90 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 370.55 रुपये होती. ( विप्रो कंपनी अंश )
मागील एका महिन्यात विप्रो कंपनीच्या शेअरची किंमत 4 टक्के घसरली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के नफा कमावून दिला आहे. आज गुरूवार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.054 टक्के घसरणीसह 459.65 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
2024 या वर्षात विप्रो कंपनीच्या शेअरची किंमत 3 टक्के घसरली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने गुंतवणुकदारांना विप्रो स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे.
ब्रोकरेज फर्मच्या मते, मार्च 2024 तिमाहीत विप्रो कंपनीचा महसूल 0.3 टक्के कमी झाला आहे. विप्रो कंपनीने मार्च तिमाहीत मार्जिन आघाडीवर चांगल्या कामगिरीसह इन-लाइन कमाई नोंदवली आहे. ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, विप्रो स्टॉकमध्ये पुढील काळात घसरण होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज हाऊसने या कंपनीचे शेअर्स 410 रुपये पर्यंत खाली येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मागील 6 महिन्यात विप्रो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		