8 September 2024 3:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Body Fat Percentage | नियमित डायट फॉलो करूनही पोटावरची चरबी कमी होत नाही? गंभीर कारण नोट करा - Marathi News My EPF Money | पगारदारांनो! सॅलरीतून महिन्याला EPF कट होतो? खात्यात जमा होणार 1 लाख रुपये - Marathi News PPF Investment | महिन्याला मिळेल 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम; PPF च्या माध्यमातून जोडा 1 करोड फंड - Marathi News Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची Business Idea | बेकरी व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी! या तरुणीने उभारला मोठ्या उद्योग, तुमची सुद्धा सुरु करा HDFC Mutual Fund | पालकांनो! तुमच्या मुलांसाठी खास योजना, महिना रु.5000 बचतीवर 1.37 कोटी परतावा मिळेल Smart Investment | होय! 15x15x15 या श्रीमंतीच्या फॉर्म्युल्याने बचत करा, दरमहा मिळतील 1 लाख रुपये - Marathi News
x

Post Office Scheme | 2000 ते 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस RD किती परतावा देईल? रक्कम नोट करा

Post Office Scheme

Post Office Scheme | आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतो कोणी पाच वर्षांसाठी तर, कोणी दहा वर्षांसाठी. अशातच पोस्टमार्फत अनेक सरकार योजना राबवल्या जातात. बरेच गुंतवणूकदार या योजनांचा पुरेपूर लाभ देखील घेतात. गुंतवणूकदार कायमच एक विश्वासाची आणि चांगला परतावा मिळवून देणारी योजना शोधत असतात.

जर तुम्ही सुद्धा एक चांगली आणि विश्वासहार्य योजना पाहत असाल तर, पोस्ट ऑफिस आरडी योजना तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते. या योजनेमध्ये तुम्ही 5 वर्षांच्या कार्यकाळापर्यंत गुंतवणूक करू शकता. दरम्यान 2000, 3000, आणि 5,000 रुपये पाच वर्षांच्या हिशोबाने प्रत्येक महिन्याला गुंतवल्यानंतर तुम्हाला एकूण किती रक्कम परत मिळणार याचं कॅल्क्युलेशन आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या RD म्हणजेच रीकरिंग डिपॉझिटमध्ये 5 वर्षांसाठी तुम्ही तुमच्या बजेटनुसार पैसे गुंतवू शकता. यामध्ये तुम्ही छोट्या इन्व्हेस्टमेंटपासून सुरुवात करू शकता.

दर तीन महिन्यांनी व्याजदरात होतो बदल :
प्रत्येक तीन महिन्यांनी व्याजदर बदलण्याची समीक्षा केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाकडे असते. ज्यामध्ये छोट्या योजनांचा समावेश असतो. केंद्र सरकारने 1 ऑक्टोंबर 2023 साली पोस्ट ऑफिस आरडीच्या व्याजदरामध्ये बदल केला होता. हा व्याजदर 6.5 टक्क्यांहून 6.7% करण्यात आला. अद्यापही या दरामध्ये बदल झालेला नाही.

2,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचं कॅल्क्युलेशन :
जर तुम्ही 5 वर्षांसाठी 2,000 रुपये प्रत्येक महिन्याला पोस्टाच्या आरडी योजनेमध्ये गुंतवत असाल तर, वर्षाला 24,000 आणि पुढील पाच वर्षांमध्ये 1,20,000 एवढी रक्कम जमा होईल. अशातच तुम्हाला 22,732 रुपये व्याजाचेच मिळतील. त्याचबरोबर तुमचं 5 वर्षांचं टोटल कॅल्क्युलेशन एक लाख 42 हजार 732 एवढे रुपये तुम्हाला परत मिळतील.

3,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचं कॅल्क्युलेशन :
3,000 च्या आरडीवर पाच वर्षांच्या गुंतवणुकीसाठी तुम्ही 1,80,000 रुपये गुंतवाल. त्यानंतर 6.7% परसेंटेजनुसार फक्त 34,097 व्याजाची रक्कम बाजूला पडेल. मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 2,14,097 एवढी रक्कम परत मिळेल.

5,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर 5 वर्षांचं कॅल्क्युलेशन :
जर तुम्ही पाच वर्षांसाठी 5000 महिन्याला RD मध्ये गुंतवणूक करत असाल तर, पाच वर्षांच्या हिशोबाने तुमच्या खात्यामध्ये 3,00,000 रक्कम जमा होईल. 6.7% व्याजदराने तुम्हाला 56,830 रुपये व्याजाचे मिळतील. म्हणजेच संपूर्ण कॅल्क्युलेशन करून मॅच्युरिटी पिरेड संपल्यावर तुमच्या हातात 3,56,830 रुपये येतील.

News Title : Post Office Scheme for good return with interest rates 05 September 2024.

हॅशटॅग्स

Post office Scheme(147)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x