
Wipro Share Price | विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड उलाढालीचे संकेत मिळत आहेत. पुढील काळात या दिग्गज आयटी कंपनीचे शेअर्स 15 टक्के खाली येऊ शकतात. ब्रोकरेज फर्म कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजच्या तज्ञांनी विप्रो स्टॉकचे रेटिंग ‘सेल’ असे अपग्रेड केले आहे.
तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स काही दिवसात घसरुन 440 रुपये किमतीवर येऊ शकतात. 28 फेब्रुवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 2 टक्क्यांच्या घसरणीसह 520 रुपये किमतीवर आले होते. तर आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी विप्रो स्टॉक 0.64 टक्के वाढीसह 521 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
मागील 3 महिन्यांपासून विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत होती. मात्र आता ब्रोकरेज फर्मने विप्रो कंपनीच्या स्टॉकचे रेटिंग कमी केले आहे. मागील 3 महिन्यांत विप्रो कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्या तुलनेत सेन्सेक्स निर्देशांक फक्त 1 टक्क्यांनी वाढला आहे. 19 फेब्रुवारी 2024 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 546 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.
तज्ञांच्या मते, विप्रो कंपनीच्या शेअर्सचे मूल्य महाग आहे. त्यातुलनेत इन्फोसिस आणि एचसीएल टेक कंपनीचे शेअर्स 6-9 टक्के सवलतीवर मिळत आहेत. विप्रो कंपनीच्या उत्पन्नात स्थिर चलन आधारावर मागील 10 वर्षांमध्ये इन्फोसिस आणि एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या तुलनेत सरासरी 5 टक्के घट झाली आहे. सध्या विप्रो कंपनीला अनेक अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करावा लागत आहे.
27 फेब्रुवारी 2023 रोजी विप्रो आणि नोकिया कॉर्पोरेशनने एंटरप्राइजेससाठी डिजिटल परिवर्तन वाढविण्याच्या उद्देशाने खाजगी 5G वायरलेस सोल्यूशन लॉन्च करण्यासाठी सहकार्य करण्याची घोषणा केली होती. या दोन्ही कंपन्यांनी उत्पादन, ऊर्जा, उपयुक्तता, वाहतूक आणि क्रीडा यासह सर्व उद्योगांमध्ये कनेक्टिव्हिटी आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेत क्रांती घडवून आणण्यासाठी सहकार्य करण्याचे निश्चित केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.