12 December 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

Yes Bank Share Price | येस बँक शेअरची रेटिंग अपग्रेड, शेअरवर 'पॉझिटिव्ह' परिमाण होणार, कमाईची संधी

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकबाबत एक सकारात्मक अपडेट आली आहे. रेटिंग एजन्सी मूडीजने येस बँकेची रेटिंग अपग्रेड केली आहे. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे येस स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. गुरूवारी येस बँक स्टॉक 8 टक्के वाढीसह 26.01 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यांनतर हा स्टॉक 27.08 रुपये किमतीवर पोहचला होता. आज शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.31 टक्के वाढीसह 25.91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( येस बँक अंश )

बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मूडीजने येस बँक स्टॉकची रेटिंग ‘स्थिर’ वरून अपडेट करून ‘पॉझिटिव्ह’ अशी केली आहे. त्याच वेळी मुडीजने येस बँकेची दीर्घकालीन परकीय चलन आणि स्थानिक चलन ठेवींची रेटिंग Ba3 अशी कायम ठेवली आहे.

या रेटिंग अपडेटनंतर गुरुवारी येस बँक स्टॉकमध्ये 8 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली होती. मूडीजने येस बँक स्टॉकची रेटिंग अपग्रेड करण्याचे कारण स्पष्ट करताना म्हंटले की, येस बँकेची आर्थिक स्थिती सुधारत आहे. त्यामुळे पुढील 12 ते 18 महिन्यांत येस बँकेच्या ठेवी वाढू शकतात. तसेच येस बँकेचा नफा देखील वाढू शकतो.

नुकताच येस बँकेने जाहीर केलेल्या जून तिमाहीच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार जून तिमाहीत येस बँकेकडे 2.64 लाख रुपयेच्या ठेवी होत्या. वार्षिक आधारावर येस बँकच्या ठेवीमध्ये 21 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. जून तिमाहीत येस बँकेच्या कर्ज वितरणात किंचित घट झाली आहे. मात्र येस बँकेची वर्षभरातील कामगिरी सकारात्मक राहिली आहे. मागील 12 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 12 July 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x