
Yes Bank Share Price | मागील काही दिवसांपासून शेअर बाजारात घसरण (NSE: YESBANK) सुरु आहे. मात्र स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी संकेत देताना म्हटले आहे की, ‘ स्टॉक मार्केट सुधारण्याच्या स्थितीत असून अलीकडच्या उच्चांकावर पोहोचल्यानंतर सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक जवळपास १० टक्क्यांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात मंगळवार आणि बुधवारी तीव्र कमकुवतपणा दाखविल्यानंतर निफ्टीने गुरुवारी ही घसरण सुरूच ठेवली आणि दिवसअखेर २६ अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. (येस बँक लिमिटेड कंपनी अंश)
येस बँकबाबत तज्ज्ञांचा सल्ला
ऑगस्ट २०२१ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत येस बँक लिमिटेड कंपनी शेअर प्राईस जवळपास ६१.८ टक्क्यांनी घसरली आहे. येस बँक स्टॉक टेक्निकल चार्टनुसार शेअरची सध्याची लेव्हल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण येस बँक शेअरची ही पातळी बऱ्याच वेळा सपोर्ट किंवा रेझिस्टन्सचे संभाव्य झोन म्हणून कार्य करते. शेअर टेक्निकल चार्टनुसार हे संकेत मिळतात की येस बँक शेअर या झोनमध्ये रिव्हर्स किंवा कंसॉलिडेट होऊ शकतो. पुढे जाऊन हा शेअर 18.80 ते 21.80 रुपयांच्या रेंज मध्ये ट्रेड करेल असा स्टॉक मार्केट तज्ज्ञांचा अंदाज आहे.
येस बँक शेअरचा कंसॉलिडेशनचा हा अपेक्षित टप्पा लक्षात घेता, शेअरमध्ये स्पष्ट ब्रेकआऊट होईपर्यंत नवीन खरेदी करू नये असा महत्वाचा सल्ला स्टॉक मार्केट तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच या शेअरने २१.८० रुपयांच्या पातळीच्या वर दैनंदिन बंद गाठला तरच येस बँक शेअर खरेदीचा निर्णय घ्यावा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
मागील १ महिन्यात येस बँक शेअर 8.79% घसरला आहे. मागील ६ महिन्यात येस बँक शेअर 14.83% घसरला आहे. मागील १ वर्षात शेअर 4.27% घसरला आहे. मागील ५ वर्षात शेअर 71.92% घसरला आहे. तसेच, YTD आधारावर येस बँक शेअर 14.83% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.