
Yes Bank Share Price | शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी स्टॉक मार्केटमध्ये जबरदस्त तेजी (NSE: YESBANK) दिसून आली. शुक्रवारी स्टॉक मार्केट सेन्सेक्सने 1961 अंकांची उसळी घेतली. शुक्रवारी ट्रेडिंग दरम्यान सेन्सेक्स 2000 अंकांच्या वर गेला होता. त्याचवेळी स्टॉक मार्केट निफ्टीने 550 हून अधिक अंकांची उसळी घेत 23,900 चा टप्पा ओलांडला होता. शुक्रवार 22 नोव्हेंबर रोजी हा शेअर 0.47 टक्के वाढून 19.22 रुपयांवर पोहोचला होता. (येस बँक लिमिटेड अंश)
क्लासिक पिव्हट लेव्हल
शुक्रवार 22 नोव्हेंबर 2024 रोजी येस बँक लिमिटेड शेअरच्या क्लासिक पिव्हट लेव्हल विश्लेषणात असे दिसून आले आहे की, डेली टाईम फ्रेममध्ये (Daily Time Frame) शेअरमध्ये 19.4 रुपये, 19.67 रुपये आणि 19.85 रुपये वर मुख्य रेझिस्टन्स आहे, तर शेअरची मुख्य सपोर्ट लेव्हल 18.95 रुपये, 18.77 रुपये आणि 18.5 रुपये आहे.
शेअरचा शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस
येस बँक लिमिटेड कंपनी शेअर मागील १ महिन्यात 4.09% घसरला आहे. येस बँक लिमिटेड कंपनी स्टॉक टेक्निकल रिपोर्टनुसार, हा शेअर 5, 10, 20 दिवसांच्या शॉर्ट टर्म सिंपल मूव्हिंग ऍव्हरेजेस तसेच 50, 100 आणि 300 दिवसांच्या दीर्घकालीन मूव्हिंग ऍव्हरेजेस’च्या खाली ट्रेड करत आहे. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार येस बँक शेअरमध्ये नकारात्मक संकेत दिसत आहेत.
शेअर दोन महिन्यांत 30 टक्क्यांनी घसरला
मागील दोन महिन्यांत येस बँक शेअर ३० टक्क्यांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते येस बँक शेअर घसरणीच्या चॅनेलमध्ये अडकला आहे. येस बँक शेअरला १९ रुपयांवर तात्काळ सपोर्ट आहे, जी शेअरमधील तेजीची महत्त्वपूर्ण पातळी आहे. शेअर या पातळीवरून घसरल्यास त्यामध्ये आणखी घसरण होऊ शकते असे तज्ज्ञांनी संकेत दिले आहेत. येस बँक शेअरसाठी तज्ज्ञांनी ‘वेट अँड वॉच’ सल्ला दिला आहे.
येस बँक शेअरने किती परतावा दिला
मागील १ महिन्यात येस बँक शेअर 4.09% घसरला आहे. मागील ६ महिन्यात शेअर 16.25% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 0.10% परतावा दिला आहे. मात्र मागील ५ वर्षात हा शेअर 70.34% घसरला आहे. तसेच YTD आधारावर येस बँक शेअर 15.14% घसरला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.