
Yes Bank Share Price | ‘येस बँक शेअर्स’ डिसेंबर 2022 मध्ये 24.75 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. त्यानंतर शेअर जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँक शेअर मध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली होती. मात्र ही तेजी कायम राहणार की नाही असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात निर्माण झाला आहे. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी येस बँक शेअर 1.19 टक्के वाढीसह 17.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Yes Bank Share Price | Yes Bank Stock Price | BSE 532648 | NSE YESBANK)
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टचे तज्ञ म्हणतात की, “सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी आर्थिक वर्ष 2022-23 च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये जबरदस्त कमाई केली आहे. मालमत्तेची गुणवत्ता आणि विक्रमी वाढ यामुळे पीएसयू बँकांच्या शेअर्सने अद्भूत कामगिरी केली, आणि लोकांना मालामाल बनवले. येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील एका वर्षभरात 24 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. येस बँकेच्या व्यवस्थापनावर स्टेट बँक ऑफ इंडियाचे नियंत्रण आल्यापासून त्याची कामगिरी सुधारत चालली आहे. याशिवाय येस बँकेला बुडीत कर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नवीन घोषणाचा लाभही मिळाला आहे.
येस बँकेच्या शेअर्सची कामगिरी :
शेअर बाजारातील तज्ञांचे मत आहे की, “येस बँकेचे शेअर्स मार्च 2023 पर्यंत विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करतील. कारण मार्च 2023 मध्ये Axis Bank, IDFC बँक सारख्या मोठ्या बँकेचा लॉक इन कालावधी पूर्ण होणार आहे. अशा परिस्थितीत या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉफिट बुकींग पाहायला मिळू शकते. शुक्रवार दिनांक 10 फेब्रुवारी दिनांक 2023 रोजी येस बँक शेअर 1.19 टक्के वाढीसह 17.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
प्रभुदास लिलाधर फर्मचे तज्ञ म्हणतात की, येस बँकेचा स्टॉक पुन्हा एकदा 16.20 रुपयेची पातळी तोडण्यास यशस्वी झाला आहे. या तेजीमुळे येस बँकेचे शेअर्स बँक बाऊन्स बॅक करू शकतात. म्हणून तज्ञांनी येस बँक स्टॉकसाठी शॉर्टटर्म लक्ष किंमत 18.50 रुपये निश्चित केली आहे. पुढील काळात हा स्टॉक 21 ते 22 रुपयांवर जाऊ शकतो असे तज्ञ म्हणतात. येस बँकेच्या शेअरमध्ये 15.50 ते 20 रुपये दरम्यान ट्रेडिंग होऊ शकते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.