
Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. मंगळवारी देखील या बँकेचे शेअर्स 13 टक्के वाढीसह 25.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील स्टॉकमध्ये अशीच तेजी पाहायला मिळत आहे. या बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, RBI ने HDFC बँकेला येस बँकमधील आपले भाग भांडवल 9.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे येस बँक स्टॉक तेजीत आला आहे. आज बुधवार दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.56 टक्के वाढीसह 26.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 23.10 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर काही वेळात या बँकेचे शेअर्स 13 टक्क्यांच्या वाढीसह 25.70 रुपये या इंट्राडे उच्चांक किमतीवर पोहोचले होते. बसवा कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, “एचडीएफसी बँकेला येस बँकेतील भाग भांडवल 9.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी आरबीआयने दिल्याने येस बँकेच्या शेअर्समध्ये उसळी पाहायला मिळत आहे.
एसबीआयनंतर, एचडीएफसी बँक भारतातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते. एवढ्या मोठ्या बँकेच्या येस बँकेतील गुंतवणूक वाढीच्या बातमीने शेअरमध्ये खरेदी वाढवली आहे”.
चॉईस ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, “येस बँकेचे शेअर्स 26 रुपये किमतीवर नवीन ब्रेकआउट देण्याच्या तयारीत आहेत. या ब्रेकआउटनंतर, येस बँकेचे शेअर्स अल्पावधीत 27.50 रुपये ते 30 रुपये किमतीवर जाऊ शकतात. येस बँकेच्या स्टॉकने 22.50 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. त्यामुळे, येस बँकेमध्ये गुंतवणूक करणारे लोक 22.50 रुपये किमतीवर स्टॉप लॉस लावू शकतात. सध्या येस बँक स्टॉक गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने आकर्षक वाटत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.