
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 4.05 टक्क्यांच्या घसरणीसह 23.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या बँकेच्या शेअर्समध्ये जोरदार विक्री पाहायला मिळत आहे. मागील चार दिवसात येस बँकेचे शेअर्स 11.66 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत. ( येस बँक अंश )
17 डिसेंबर 2022 रोजी येस बँकेने जेसी फ्लॉवर्स एआरसी कंपनीसोबत एनपीए पोर्टफोलिओच्या विक्रीशी संबंधित करार केला होता, या संदर्भात येस बँकेला ट्रस्टकडून 61 कोटी रुपये मिळाले आहे. आज मंगळवार दिनांक 7 मे 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 5.19 टक्के घसरणीसह 22.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
नुकताच येस बँकेच्या संचालक मंडळाने 13 डिसेंबर रोजी Verventa कंपनीला वाटप केलेल्या 1,27,98,80,909 शेअर वॉरंटचे रुपांतर करून त्यांना 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 1,27,98,80,909 पूर्ण पेड अप इक्विटी शेअर्स वाटप करण्यास मंजुरी दिली आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 23-24 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट पाहायला मिळत आहे. तर शेअरची प्रतिकार पातळी 26 रुपये किमतीवर आहे. तज्ञांच्या मते, मंदीच्या काळात येस बँक स्टॉक 21 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर तेजीच्या काळात हा स्टॉक 26-27 रुपये किंमत स्पर्श करू शकतो.
रेलिगेअर ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांच्या मते, येस स्टॉक पुढील काळात 20 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. तर शेअरची प्रतिकार पातळी 26 रुपयेवर आहे. Tips2trades फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकमध्ये 26.15 रुपये किमतीवर मजबूत प्रतिकार पाहायला मिळत आहे. आणि नजीकच्या काळात हा स्टॉक 20 रुपये किमतीवर जाऊ शकतो.
आनंद राठी शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर्स फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉकची सपोर्ट लेव्हल 23.50 रुपये किमतीवर आहे. तर प्रतिकार पातळी 25.75 रुपये किमतीवर आहे. प्रतिकार पातळी तोडल्यास हा स्टॉक 29 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. पुढील एका महिन्यासाठी या स्टॉकची अपेक्षित ट्रेडिंग रेंज 23 रुपये ते 29 रुपये दरम्यान असेल. येस बँक स्टॉकचे प्राइस-टू-इक्विटी गुणोत्तर 1.66 आहे. तर प्राइस-टू-बुक प्रमाण 56.44 टक्केवर आहे. शेअरची प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS 2.97 आहे. या स्टॉकचा 14 दिवसाचा RSI 45.05 अंकावर आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.