
Yes Bank Share Price | येस बँक या खाजगी क्षेत्रातील बँकेचे शेअर्स अफाट तेजीत वाढत आहेत. मंगळवारी या बँकेचे शेअर्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकने अप्पर सर्किट हीट केला आहे. येस बँकेच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच बँकेने 51 टक्के हिस्सेदारी विक्रीचा अहवाल तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आणि पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ( येस बँक अंश )
काही दिवसापूर्वी येस बँक आपला 51 टक्के हिस्सा विकण्याची तयारी करत आहे, अशी बातमी मीडियामध्ये देण्यात आली होती. ही बातमी येस बँकेने पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आज गुरूवार दिनांक 11 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 4.45 टक्के वाढीसह 26.07 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
काही दिवसांपूर्वी एका मीडिया हाऊसने बातमी प्रसिद्ध केली की, भारतीय रिझर्व्ह बँकने येस बँकेच्या प्रवर्तकांना 51 टक्के वाटा विक्री करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे, जे अंतर्गत व्यवसायाच्या दृष्टीने सामान्य बाब आहे. या रिपोर्टमध्ये माहिती देण्यात आली होती की, संभाव्य विक्रीमुळे येस बँकेचे मालमत्ता मूल्य 10 अब्ज डॉलर्सवर जाऊ शकते. यामुळे ही डील भारतातील बँकिंग क्षेत्रातील आतापर्यंतची सर्वात मोठी डील ठरणार आहे. मात्र येस बँकेने या बातमीला कुठलाही दुजोरा दिलेला नाहीये.
मीडिया रिपोर्टनुसार RBI अद्याप येस बँकेचे भागभांडवल खरेदी करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांच्या योग्यतेची तपासणी करत आहे. RBI ने योग्य खरेददारांची निवड करण्यासाठी सिटीग्रुपची नियुक्ती केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, Axis बँक आणि LIC यांनी येस बँकेचे जवळपास एक तृतीयांश भागभांडवल धारण केले आहेत. बुधवारी येस बँक स्टॉक सकाळी 26.08 रुपये किमतीवर ओपन झाला होता. तर दिवसभरात हा स्टॉक 26.08 रुपये किमतीवर पोहचला होता. दिवसाअखेर येस बँक स्टॉक 25.68 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.