
Yes Bank Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांचे शेअर्स जून तिमाहीतील मजबूत निकालामुळे ॲक्शनमध्ये आले आहेत. शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स 0.03 टक्क्यांच्या वाढीसह 79,897.34 अंकावर क्लोज झाला होता. तर निफ्टी-50 निर्देशांक 0.03 टक्क्यांच्या घसरणीसह 24,315.95 अंकावर क्लोज झाला होता. अशा काळात जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे.
आज या लेखात आम्ही तुम्हाला टॉप 3 स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत, जे पुढील काळात तुम्हाला मालामाल करू शकतात. यामधे आयआरईडीए, येस बँक आणि एव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सामील आहेत.
आयआरईडीए :
या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. तज्ञांच्या मते या स्टॉकने 240 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुढील काळात 300 रुपये किमतीच्या पार जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 284 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
येस बँक :
तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहे. या स्टॉकने 21.50 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. तर या शेअरला 28-35 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. येस बँक स्टॉक आपल्या 200 दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. जर या स्टॉकने 28 रुपये किमतीवर ब्रेकआऊट दिला तर शेअर अल्पावधीत 35 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.77 टक्के घसरणीसह 25.63 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
अव्हेन्यू सुपरमार्ट्स :
तज्ञांच्या मते, या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीचे संकेत देत आहेत. या स्टॉकने 4600 रुपये किमतीवर मजबूत सपोर्ट निर्माण केला आहे. या स्टॉकला 5,000-5,600 रुपये किमतीवर जोरदार प्रतिकार मिळत आहे. जर या स्टॉकने 5,000 रुपये किमतीवर ब्रेक आऊट दिला तर शेअर अल्पावधीत 5600 रुपये किमतीवर जाऊ शकतो. शुक्रवार दिनांक 12 जुलै 2024 रोजी हास्टॉक 1.04 टक्के वाढीसह 4,950 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.