
Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 12 टक्क्यांच्या वाढीसह 23.40 रुपये किमतीवर पोहचले होते. या बँकेचे एकूण बाजार भांडवल 67460 कोटी रुपये आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.50 रुपये होती. ( येस बँक अंश )
मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 28 टक्के नफा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सची किंमत तब्बल 53 टक्के वाढली आहे. येस बँकच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे बँक सध्या नवीन प्रवर्तकाच्या शोधत असल्याची बातमी मिळत आहे. शुक्रवार दिनांक 15 मार्च 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.49 टक्के वाढीसह 23.80 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
येस बँक आणि विविध वित्तीय संस्था यांच्यात गुंतवणुकी संदर्भात चर्चा सुरू असल्याची बातमी तज्ञांनी दिली आहे. येस बँक आपले 51 टक्के भाग भांडवल विकून निधी जमा करण्यासाठी जपान, पश्चिम आशिया आणि युरोपमधील वित्तीय संस्थांशी आणि गुंतवणुकदारासोबत चर्चा करत आहे.
येस बँक ही भारतातील सहाव्या क्रमांकाची खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. येस बँक आपले 51 टक्के भाग भांडवल एकूण 8-9 अब्ज डॉलरच्या मुल्यांकनावर विकण्याची शक्यता आहे. येस बँकेचे बाजार भांडवल सध्या 7.2 बिलियन डॉलर्स आहे. मीडिया रिपोर्टनुसार सिटी ग्रुप इंडिया येस बँकेमध्ये मोठी गुंतवणुक करू शकते.
RBI च्या नियमानुसार कोणत्याही भारतीय बँकेत गुंतवणुकदारांना 26 टक्के पेक्षा जास्त भाग भांडवल धारण करण्यापूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेची मंजुरी घ्यावी लागते. जर येस बँकेत नवीन प्रवर्तकांची एन्ट्री झाली तर स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी, एचडीएफसी बँक लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक यासारख्या विद्यमान गुंतवणुकदारांना येस बँकेतून बाहेर पडता येईल. 2020 मध्ये जेव्हा येस बँक आर्थिक संकटात अडकली होती, तेव्हा भारतातील काही दिग्गज बँकांनी मिळून गुंतवणूक करून येस बँक बुडण्यापासून वाचवली होती. सध्या, स्टेट बँक ऑफ इंडियाने येस बँकेचे 29 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.