
Yes Bank Share Price| येस बँकेच्या शेअरमध्ये मागील काही दिवसापासून जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील या बँकेचे शेअर्स विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. 19 फेब्रुवारी रोजी येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 28.45 रुपये किमतीवर ओपन झाले होते.
मात्र दिवसा अखेर शेअर 27 रुपये या दैनिक नीचांकी किमतीवर क्लोज झाला होता. आज मंगळवार दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.85 टक्के घसरणीसह 26.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
येस बँकेच्या शेअर्समध्ये घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनदरम्यान येस बँकेचे 24.78 कोटी शेअर्स ब्लॉक डील अंतर्गत विकले गेले होते. या शेअर्सचे एकूण मूल्य 674 कोटी रुपये होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी बातमी आली होती की, अमेरिकेच्या कार्लाइल ग्रुपने येस बँकेचे 1.35 टक्के भाग भांडवल 1056.9 कोटी रुपये किमतीला विकले आहे.
कार्लाइल ग्रुपचा भाग असलेल्या सीए बास्क इन्व्हेस्टमेंट फर्मने देखील येस बँकेचे 39 कोटी शेअर्स सरासरी 27.10 रुपये किमतीवर विकले आहेत. या शेअर्सपैकी 30,63,05,668 शेअर्स मॉर्गन स्टॅनले एशिया फर्मने त्याच किमतीवर खरेदी केले होते. त्यांचे एकूण मूल्य 830.08 कोटी रुपये आहे.
येस बँकेतील कार्लाइल ग्रुपचा हिस्सा डिसेंबर 2023 मध्ये 6.43 टक्के कमी होऊन 5.08 टक्केवर आला होता. CA Basque Investments ही कंपनी CA Marans Investments कंपनीच्या मालकीद्वारे चालवले जाणारे स्पेशल पर्पज व्हेहिकल आहे. हे कार्लाइल ग्रुपच्या युनिट्सद्वारे व्यवस्थापित केलेल्या निधीवर चालवले जाते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.