
Yes Bank Share Price | येस बँकेच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसापासून मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 25.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील हा बँकिंग स्टॉक मजबूत तेजीत वाढत आहे. आज मंगळवार दिनांक 23 एप्रिल 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 2.58 टक्के वाढीसह 25.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( येस बँक अंश )
येस बँकेच्या शेअर्समध्ये सोमवारी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, येस बँकेला 284.21 कोटी रुपये कर परतावा मिळणार आहे, आणि दुबईस्थित एमिरेट्स एनबीडी ही कंपनी येस बँकेमध्ये गुंतवणूक करण्यास तयार झाली आहे. मीडियानुसार दुबईस्थित कंपनी येस बँकेतील बहुसंख्य भाग भांडवल खरेदी करू शकते. या दोन्ही सकारात्मक बातम्यांमुळे येस बँकेचे शेअर्स तेजीत आले आहे.
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 24.04 रुपये किमतीवर ओपन झाले होते. त्यानंतर हा स्टॉक 25.15 रुपये किमतीवर पोहचला होता. 27 एप्रिल रोजी येस बँक आपले मार्च तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 54.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.