Yes Bank Share Price | येस बँक शेअर ब्रेकआऊट देण्याच्या तयारीत, मोठी कमाई होणार, लेटेस्ट अपडेट आली

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किंचित वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज हा स्टॉक जोरदार नफा वसुलीला सामोरे जात आहे. मंगळवारी येस बँकेच्या संचालक मंडळाने भांडवल उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. त्यानंतर बुधवारी हा स्टॉक तेजीत आला होता. शुक्रवार दिनांक 23 ऑगस्ट 2024 रोजी येस बँकेच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ( येस बँक अंश )

या बैठकीत येस बँकेचे संचालक कर्ज रोख्यांच्या इश्यूद्वारे भारतीय तसेच विदेशी चलनात भांडवल उभारण्याच्या योजनेवर चर्चा करणार आहेत. येस बँक नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर, बाँड किंवा मध्यम मुदतीच्या नोट्स इत्यादी जारी करून निधी जमा करणार आहे. आज गुरूवार दिनांक 27 जून 2024 रोजी येस बँक स्टॉक 1.22 टक्के घसरणीसह 23.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस बँकेच्या संचालक मंडळाने मंगळवार दिनांक 25 जून 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत 23 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मसुद्यावर चर्चा केली आहे. येस बँक पुढील काळात भारतीय तसेच परकीय एक्सचेंजमध्ये नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचर, बॉन्ड्स, मिड टर्म नोट्स इत्यादींसह डेट सिक्युरिटीज जारी करून कर्ज घेऊन भांडवल उभारणी करणार आहे.

बुधवारी येस बँकेचे 14.5 कोटींपेक्षा जास्त शेअर्स ट्रेड झाले होते. येस बँक स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.85 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 15.70 रुपये होती. येस बँक स्टॉक आपल्या 20 दिवस, 50 दिवस आणि 200 दिवसाच्य एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज किमतीच्या वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक 100 दिवसांच्या EMA च्या खाली ट्रेड करत आहेत.

सेंट्रम ब्रोकिंग फर्मच्या तज्ञांनी येस बँकेच्या शेअर्सवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते, हा स्टॉक 24.70 रुपये किमतीच्या पार गेला तर शेअर अल्पावधीत 28-30 रुपये किमतीवर जाऊ शकतो. तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करताना 22 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. येस बँक स्टॉक BSE 100 इंडेक्समध्ये ट्रेड करत आहे.

येस बँकेचे एकूण बाजार भंडावल 75,268.26 कोटी रुपये आहे. मागील 6 महिन्यांत येस बँकेचे शेअर्स 14 टक्के वाढले आहेत. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 88.4 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 27 June 2024.