Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग, शेअर प्राईस किती रुपयांनी घसरणार?

Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकमध्ये मागील काही काळापासून जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणुकदारांना हा स्टॉक विकून नफा वसुली करण्याचा सल्ला दिला आहे. तिमाही निकालानंतर येस बँक स्टॉक फोकसमध्ये आला होता. मात्र आता या शेअरमधून मंदीचे संकेत मिळत आहेत. आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने येस बँक स्टॉकवर ‘SELL’ रेटिंग कायम ठेवली आहे. ( येस बँक अंश )

आयसीआयसीआय सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात म्हटले आहे की, येस बँकेचे सध्याचे मूल्यांकन योग्य असून बँकेने जून तिमाहीत 5 अब्ज रुपये PAT नोंदवला आहे. येस बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन किंवा एनआयएम तिमाही-दर-तिमाही आधारावर स्थिर राहिले आहे. बँकेचा परिचलन खर्च आणि क्रेडिट खर्च तिमाही-दर-तिमाही आधारावर घटला आहे. आज सोमवार दिनांक 29 जुलै 2024 रोजी येस बँक स्टॉक 0.28 टक्के वाढीसह 25.04 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

येस बँकेने आपले ऑपरेटिंग पॅरामीटर्स सुधारण्यासाठी काम सुरू केले आहे. सध्या येस बँकेच्या ROA वर RIDF गुंतवणुकीचा 11 टक्के भार आहे. येस बँक ऑरगॅनिक PSL उत्पन्नासाठी जोरदार प्रयत्न करत आहे, त्यामुळे RIDF चा वाढता भार कमी होण्यास मदत होईल. क्रेडिट खर्चात कपात केल्याने आर्थिक वर्ष 2025-26 पर्यंत येस बँकेचा ROA 0.7 ते 1 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. ICICI सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, येस बँक स्टॉक पुढील काळात 20 रुपये किमतीवर जाऊ शकतो. गुरुवारी 25 जुलै रोजी येस बँक स्टॉक 1.16 टक्क्यांच्या घसरणीसह 24.62 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.

मागील एका वर्षात येस बँकेच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन आणि तीन वर्षात स्टॉक येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अनुक्रमे 72 टक्के आणि 88 टक्के परतावा कमावून दिला आहे. 9 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 32.81 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. हा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमतीवरून 30 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. येस बँक स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 14.10 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 29 July 2024.