25 April 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank FD Interest Rates | सुरक्षित भरघोस कमाई! 1 वर्षापर्यंतच्या FD वर मिळेल 8.5 टक्के परतावा, पाहा बँकांची यादी Smart Investment | दर महिन्याला करा रु.5000 ची गुंतवणूक, मुलांच्या उच्च शिक्षण आणि लग्नकार्यावेळी 57 लाख मिळतील Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची खास योजना, जेवढी गुंतवणूक कराल, त्याहून अधिक परतावा व्याजातून मिळेल 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! DA पासून HRA पर्यंत होणार मोठी सुधारणा, किती रक्कम वाढणार? Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 25 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Budh Rashi Parivartan | बुध ग्रह मार्गी होणार, या 3 राशींची लोकं ठरणार नशीबवान, तुमची राशी कोणती? Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर्स तेजीच्या दिशेने, पुढे 100 टक्के परतावा देईल, काय म्हटले तज्ज्ञांनी?
x

VIDEO: ‘अपनी बात राहुल के साथ’, राहुल गांधींचा जनतेशी थेट संवाद!

नवी दिल्ली : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निरनिराळ्या रणनीतीचा अवलंब करताना दिसत आहेत. आता त्यांनी थेट जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि मोदींच्या ‘चाय पे चर्चा आणि मन की बात’ला टक्कर देण्यासाठी ‘अपनी बात राहुल के साथ’ हा संवाद उपक्रम राबविणार आहेत.

काही दिवसांपूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत भोजनाचा आस्वाद घेतला होता. सदर विषयाला अनुसरून त्यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांकडून खूप काही शिकायला मिळाल्याचे म्हटले आहे. त्या ट्विट’मध्ये राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, ‘मी काही दिवसांपूर्वी देशभरातून आलेल्या काही विद्यार्थ्यांची भोजनाप्रसंगी भेट घेतली. ती भेट अत्यंत महत्वपूर्ण ठरली. आमच्यात विचारांची देवाण-घेवाण झाली. यातून मी खूप काही शिकलो’.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांबरोबर मोदी सरकार, शिक्षण व्यवस्था तसेच काही इतर महत्वाच्या मुद्यांवर सविस्तर आणि समोरासमोर चर्चा करताना दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसने ‘अपनी बात राहुल के साथ’ हा उपक्रम सुरू केल्याचे सांगण्यात येते.

हॅशटॅग्स

#Rahul Gandhi(251)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x