
Yes Bank Share Price | मंगळवार, २४ डिसेंबर रोजी स्टॉक मार्केटची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली होती. त्यानंतर शेअर बाजारात सुस्त ट्रेडिंग झाल्याचे दिसून आले. शेअर बाजाराच्या बेंचमार्क निर्देशांकावर देखील सुस्त ट्रेडिंग झाल्याचे पाहायला मिळाले. बीएसई सेन्सेक्स 78,550 च्या आसपास तर एनएसई निफ्टी 23,750 च्या वर पोहोचला होता. दरम्यान, येस बँक शेअरबाबत अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने महत्वाचा सल्ला दिला आहे. (येस बँक कंपनी अंश)
येस बँक शेअरची सध्याची स्थिती
मंगळवार, 24 डिसेंबर 2024 रोजी येस बँक शेअर 0.45 टक्के घसरून 19.82 रुपयांवर पोहोचला होता. येस बँक लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 32.85 रुपये होता, तर शेअरचा 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 19.02 रुपये होता. येस बँक लिमिटेडचे एकूण मार्केट कॅप सध्या 62,230 कोटी रुपये आहे.
अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म – येस बँक शेअरबाबत सल्ला
अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने येस बँक शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग जाहीर केली आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मने येस बँक शेअरसाठी 15 ते13 रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मच्या मते येस बँक 19.80 रुपयांवरून आता 15 ते13 रुपयेपर्यंत घसरू शकतो.
अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्म – येस बँक साप्ताहिक चार्ट संकेत
अरिहंत कॅपिटल ब्रोकिंग फर्मच्या मते येस बँकेच्या साप्ताहिक चार्टवर लोअर टॉप लोअर बॉटम फॉर्मेशन संकेत दिसत आहेत. शिवाय, येस बँकचा मोमेंटम इंडिकेटर आरएसआय नकारात्मक संकेत देत आहे. बेंचमार्क निर्देशांकांच्या तुलनेतही येस बँक शेअर कमी कामगिरी करत आहे. साप्ताहिक चार्टवरील या संकेतानुसार येस बँक शेअरमधील घसरणीचा ट्रेंड कायम राहण्याची शक्यता असल्याचे अरिहंत कॅपिटलने म्हटले आहे. म्हणजे येत्या काही आठवड्यांत येस बँक शेअर १५ ते १३ रुपयांपर्यंत घसरू शकतो. त्यामुळे सध्याच्या पातळीवर हा शेअर ‘SELL’ करावा असं ब्रोकरेजने म्हटलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.