
Zomato Share Price | अश्वथ दामोदरन हे शेअर बाजारातील प्रसिद्ध “स्टॉक गुरू” म्हणून ओळखले जातात. अश्वथ दामोदरन यांनी जुलै 2021 मध्ये Zomato च्या शेअर्सबाबत एक भाकीत वर्तवले होते की हा स्टॉक 41 रुपयांच्या पातळीपर्यंत खाली पडेल. आज स्टॉक 45 रुपयांवर व्यवहार करत आहे आणि त्यात पडझड अजून सुरूच आहे.
झोमॅटोच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण :
झोमॅटोच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण झाल्यानंतर आज गुरुवारी थोडीशी वाढ झाली. पण प्रचंड तोट्यात असलेल्या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी एवढीशी वाढ पुरेसे नाही. नोव्हेंबर 2021 मध्ये हा स्टॉक आपल्या सर्वकालीन उच्चांक पातळीवर पोहोचला होता, तेव्हापासून Zomato शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत आहे. गुरुवारी दुपारी एक वाजता एनएसईवर कंपनीचे शेअर्स 45.30 रुपयांवर ट्रेड करत होते. स्टॉक गुरू दामोदरन यांनी झोमॅटोच्या या कामगिरीबद्दल वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरला आहे. कदाचित हा स्टॉक पुढील काही दिवसात आणखी खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा दामोदरन यांनी झोमॅटोच्या शेअर्सबाबत एक नवीन भाकीत वर्तवले आहे.
काय म्हणाले होते अश्वथ दामोदरन :
दामोदरन यांनी जुलै 2021 मध्ये Zomato च्या शेअर्सबाबत एक अंदाज वर्तवला होता आणि सांगितले होते की हा स्टॉक 41 रुपयांच्या पातळीवर जाईल. आज तो 45 रुपयांवर ट्रेड करत आहे. म्हणजेच अश्वथ दामोदरन यांनी जो अंदाज बांधला होता तो जवळपास खरा ठरला आहे. त्यांचा अंदाज इतका अचूक होता की आज स्टॉकची किंमत त्यांच्या अंदाजानुसार वर्तवलेल्या किमतीच्या जवळपास आहे. पुढील काही दिवसात हा स्टॉक आणखी पडला तर नवल वाटायला नको.
दामोदरन यांचे नवीन भाकीत :
शेअर बाजारातील स्टॉक गुरू दामोदरन यांनी आता पुन्हा या स्टॉक बद्दल भाकीत वर्तविले आहे आणि गुंतवणूकदारांमध्ये यामुळे खळबळ माजली आहे. गुंतवणूकदार प्रचंड तणावात आहेत. त्यांनी भाकीत वर्तवले आहे की येत्या पुढील काही काळात या शेअरमध्ये आणखी घसरण होणार आहे आणि हा स्टॉक 35 रुपये पर्यंत घसरू शकतो. झोमॅटोच्या बाबतीत बिग बुल राकेश झुनझुनवाला यांचा अंदाजही खरा ठरला आहे.
झोमॅटोच्या कामगिरीबद्दल बिग बुल काय म्हणाले :
सुमारे वर्षभरापूर्वी जेव्हा कंपनीचे शेअर्स नवीन उच्चांक गाठत होते, तेव्हा झुनझुनवाला म्हणाले होते की, “जर मी म्हणालो की तुम्ही Zomato चे शेअर खरेदी करू नका, तर लोक मला मूर्ख म्हणतील “. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये राकेश झुनझुनवाला यांचे हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. सध्या Zomato च्या शेअर्सच्या घसरणीचे प्रमुख कारण म्हणजे स्टॉक चा लॉक-इन कालावधी संपला आहे आणि तोट्यात असलेले गुंतवणूकदार त्यातून आपली गुंतवणूक विकून बाहेर पडत आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.