बीजिंग : चायनामधील महाकाय कंपनी ‘अलीबाबा’ या ऑनलाइन विक्री करणाऱ्या पोर्टलने रविवारी ११ नोव्हेंबरला तब्बल २ लाख १८ हजार कोटींची कमाई करण्याचा विक्रम केला आहे. दरम्यान, केवळ एकाच दिवसात इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री करणारी अलीबाबा ही जगातील पहिली चिनी वेबसाइट ठरली आहे. चीनमध्ये प्रतिवर्षी ११ नोव्हेंबरला “सिंगल्स डे” साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून या दिवशी दरवर्षी अलिबाबा ग्राहकांना आकर्षक सूट देते.

त्यात मुख्यत्वे डायनिंग सेट्स, अॅपलचे मोबाइल सुद्धा अत्यंत स्वस्त दरात या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध केले जातात. त्यामुळे चीनमधील लोकं मोठ्या त्यांची संधी म्हणून मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यावर्षी या पोर्टलने तब्बल २२ खर्व रुपयांची विक्रमी खरेदी केली आहे. या खरेदीत मुख्यत्वे अॅपलचे आयपॅड, शाओमीचे मोबाइल आणि डायसनच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणावर विकल्या गेल्याचे वृत्त आहे.

तसेच प्रतिवर्षी ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता ही कंपनी पुढच्यावर्षी सुद्धा अधिक आकर्षक वस्तूंचा सेल ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागील काही वर्षांपासून चीनमध्ये बाजारात प्रत्यक्ष भेट देऊन विकत घेण्यापेक्षा त्या ऑनलाईन खरेदी करण्यावर भर देण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, चीनमधील कोसळणारी अर्थव्यवस्था, वाढती महागाई, वाढता आयातदर अशा कोणत्याही गोष्टींचा परिणाम अलिबाबाच्या ‘सेल’ वर आणि व्यवसायावर झालेला नाही हे स्पष्ट झालं आहे. दरवर्षी सिंगल्स डे विशेष सेलचे आयोजन करत असतो. यादिवशी ग्राहकांना अत्यंत आकर्षक सवलती दिल्या जातात. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या सेलला चांगला प्रतिसाद मिळतो आहे’ असं जैक मा यांनी सांगितलं आहे.

chinas largest eCommerce company alibaba sets a world record in sale in a single day