12 December 2024 12:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON
x

धुळे: आमदार अनिल गोटेंचं भाजप विरुद्ध बंड; स्वतःच 'महापौर' पदाचे उमेदवार

धुळे : धुळे शहरातील राजकीय वातावरण सध्या आमदार अनिल गोटेंच्या भाजप विरोधातील बंडामुळे तापलं आहे. धुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक आमदार अनिल गोटे यांनी आपल्याच पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांच्या या आक्रमक शैलीचे पडसाद भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत सुद्धा सर्वांना पाहायला मिळाले. त्यामुळेच आमदार गोटे यांच्या रविवारी रात्री झालेल्या सभेकडे संपूर्ण धुळे शहराचं लक्ष होतं.

शहरातील साक्री रोडवरील शिवतीर्थालगत सायंकाळी ७ च्या सुमाराला भाजपच्याच नावाने त्यांची सभा पार पडली. दरम्यान, यावेळी माजी नगराध्यक्षा हेमा गोटे, तेजस गोटे, भीमसिंग राजपूत, सुनील नेरकर, निलम वोरा, दिलीप साळुंखे, प्रमोद मोराणकर यांच्यासह अनिल गोटे यांचे समर्थक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही वेळाने गोटे यांनी भाषण सुरू केले. त्यादरम्यान, उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच विरोधकांवरही सुद्धा तोंडसुख घेतल्याचे पाहायला मिळाले.

तसेच त्यांच्या तब्बल दीड तासाच्या भाषणात आमदार गोटे यांनी विरोधकांवर टीका आणि धुळे शहर विकासावरच अधिक वेळ खर्ची घातला, त्यामुळे उपस्थितांमध्ये सुद्धा ते नेमकी कोणती महत्वाची घोषणा करणार याची उत्कंठा होती. अखेर भाषणाच्या अगदी शेवटी पुढचा महापौर आमदार अनिल गोटे असे जाहीर केले. आणि ही घोषणा तुम्हाला मंजूर, लॉक किया जाए…असे म्हणताच त्यांना जोरदार घोषणांनी समर्थन देण्यात आले.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x