 
						Zomato Share Price | झोमॅटो कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के वाढीसह 199.75 रुपये किमतीवर पोहचले होते. मात्र दिवसाअखेर हा स्टॉक विक्रीच्या दबावात क्लोज झाला होता. मात्र ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलने या कंपनीच्या शेअर्समध्ये 32 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. ( झोमॅटो कंपनी अंश )
जेएम फायनान्शिअल फर्मने झोमॅटो कंपनीच्या शेअरवर बाय रेटिंग देऊन टार्गेट प्राइस 200 रुपयेवरून वाढवून 260 रुपये निश्चित केली आहे. तज्ञांच्या मते, पुढील तीन वर्षांत या कंपनीचे शेअर्स 400 रुपये किमतीवर जाऊ शकतात. शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी झोमॅटो स्टॉक 1.63 टक्के घसरणीसह 193.70 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ब्रोकरेज फर्मचा विश्वास आहे की, झोमॅटो कंपनी हायपरलोकल डिलिव्हरी व्यवसायांमध्ये मजबूत कामगिरी करु शकते. डिसेंबर 2023 पर्यंत या कंपनीचे कॅश फ्लो 12000 कोटी रुपये होते. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की नजीकच्या काळात, ब्लिंकिट कंपनी डार्क-स्टोअर नेटवर्कचा विस्तार करून, रिटेल श्रेणीमध्ये वाढ करून आपली गुंतवणूक वाढवेल. झोमॅटो कंपनीच्या ऑर्डर व्हॉल्यूममध्ये मजबूत सुधारणा अपेक्षित आहे.
मागील एका महिन्यात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 27 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2024 या वर्षात कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 61 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सची किंमत 274 टक्के मजबूत झाली आहे. या कंपनीचा IPO 2021 मध्ये लाँच करण्यात आला होता. झोमॅटो कंपनीच्या IPO शेअर्सची किंमत 76 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		