
Zomato Share Price | झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनीच्या शेअरने 2023 या वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. 2024 मध्ये या कंपनीचे शेअर्स नवीन रॅलीसाठी तयार झाले आहेत. 2023 या वर्षात झोमॅटो कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.
मागील काही महिन्यांपासून झोमॅटो कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान खरेदी पाहायला मिळत होती. मात्र नुकताच कंपनीला जीएसटी डिमांड नोटीस जारी करण्यात आली आणि शेअर्स किंचित घसरला. शुक्रवार दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी झोमॅटो स्टॉक 0.41 टक्के वाढीसह 123.70 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गनने झोमॅटो कंपनीच्या शेअर्सवर ‘ओव्हरवेट’ रेटिंग देऊन शेअरची टार्गेट प्राइस 150 रुपये निश्चित केली आहे. 28 डिसेंबर 2023 रोजी झोमॅटो कंपनीचे शेअर्स 123 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच सध्याच्या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक आणखी 22 टक्क्यांनी वाढू शकतो. ब्रोकरेज फर्म सिटीने झोमॅटो स्टॉकवर 145 रुपये टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. मागील एका वर्षभरात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.
जेपी मॉर्गन फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, झोमॅटो कंपनीला मिळालेली 400 कोटी रुपये जीएसटीची नोटीस कंपनीला फटका देऊ शकते. आणि कंपनी हा फटका ग्राहकांना देईल. अलीकडेच, झोमॅटो कंपनीला डिलिव्हरी फी म्हणून जमा झालेल्या रकमेवर 400 कोटी रुपये कर दायित्व भरण्यासाठी GST विभागाने कारणे दाखवा नोटीस धाडली होती.
झोमॅटो कंपनीच्या मते, डिलिव्हरी पार्टनरद्वारे डिलिव्हरी फी गोळा केली जाते, म्हणून कंपनी हा कर भरण्यास जबाबदार नाही. आपली बाजू झोमॅटो कंपनी लवकरच नोटीसला उत्तर म्हणून दाखल करणार आहे. अनेक ब्रोकरेज फर्मच्या तज्ञांच्या मते, जर झोमॅटो कंपनी GST साठी जबाबदार असेल, तर मार्च 2022 पर्यंत 290 कोटी आणि मार्च 2023 ते मार्च 2024 पर्यंत कंपनीला 280 कोटी रुपये एकरकमी GST भरावा लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.