
Zomato Share Price | मागील काही दिवसांपासून झोमॅटोच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. फक्त एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत, Zomato च्या शेअर्समध्ये तब्बल 60 टक्के पेक्षा जास्त वाढ पाहायला मिळाली आहे. कंपनीचे शेअर्स 41 रुपयांवर ट्रेड करत होते ते आता 67 रुपयांपर्यंत गेले आहेत.
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म Zomato च्या शेअर्सनी मागील काही दिवसांमध्ये अचानक उसळी घेतली आहे. फक्त एका महिन्यात Zomato चे शेअर्स तब्बल 60 टक्के पेक्षा जास्त वर गेले आहेत. zomato कंपनीचे शेअर्स एक महिन्यापूर्वी 41 रुपयांवर ट्रेड करत होते, ते आता 67 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या वर्षी जूनमध्ये झोमॅटोच्या शेअर्समध्ये तब्बल 28 टक्के आणि जुलैमध्ये 13 टक्के पेक्षा जास्त घट झाली होती. कंपनीचा एक वर्षाचा लॉक-इन कालावधी संपल्यानंतर झोमॅटोच्या शेअर्समध्ये जबरदस्त विक्री पाहायला मिळाली होती.18 ऑगस्ट 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये Zomato चे शेअर्स 67.05 रुपयांच्या पातळीवर ट्रेड करत होते, आणि दिवसा अखेर याच किमतीवर बंद झाले आहेत.
1 लाख रुपयेचे झाले 1.65 लाख रुपये :
27 जुलै 2022 रोजी Zomato कंपनीचे शेअर्स BSE वर 40.55 रुपयांच्या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर ट्रेड करत होते. 18 ऑगस्ट 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 67.05 रुपयांवर जाऊन बंद झाले, मात्र ही त्याची उच्चांक किंमत नाही. Zomato च्या शेअर्सनी या कालावधीत आपल्या भागधारकांना तब्बल 60 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. जर तुम्ही 27 जुलै रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि तुमची गुंतवणूक होल्ड केली असती, तर सध्या तुम्हाला 1.65 लाख रुपये परतावा मिळाला असता. Zomato च्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत 169.10 रुपये आहे.
म्युच्युअल फंडांनी झोमॅटोचे शेअर्स खरेदी केले :
जुलैमध्ये म्युच्युअल फंडांनी झोमॅटोमधील त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. नुकताच जाहीर झालेल्या तिमाहीच्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की, झोमॅटोमधील म्युच्युअल फंडांची हिस्सेदारीमध्ये जुलै 2022 नंतर 3.65 टक्के इतकी भरघोस वाढ झाली आहे. सर्व म्युच्युअल फंडांकडे आता झोमॅटोचे 28,70,54,377 शेअर्स होल्ड आहेत. 30 जून 2022 पर्यंत, म्युच्युअल फंडांनी Zomato मधील 17,89,12,601 शेअर्स गोल्ड केले होते म्हणजेच त्यांचा एकूण वाटा 2.71 टक्के होता. जर आपण म्युचुअल फंडनी केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्याबद्दल बोललो तर, जुलैच्या अखेरीस म्युच्युअल फंडांची झोमॅटोच्या शेअर्समध्ये तब्बल 1343.41 कोटी रुपये गुंतवणूक आहे. जूनच्या आधी पासूनच म्युच्युअल फंडांनी झोमॅटोचे 963.44 कोटी रुपयांचे शेअर्स होल्ड करून ठेवले होते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.