
Zomato Share Price | फूड डिलिव्हरी झोमॅटोच्या शेअरमधे अचानक तेजी दिसून आली. झोमॅटोच्या स्टॉकमध्ये एका दिवसात 7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आणि BSE निर्देशांकावर इंट्रा-डे ट्रेडमध्ये स्टॉक 70.20 रुपये किमतीवर पोहोचला होता. फूड डिलिव्हरी स्टार्टअप झोमॅटो कंपनीच्या शेअरमध्ये सलग तीन दिवसापासून कमालीची तेजी दिसून येत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 69.30 रुपये किमतीवर बंद झाले होते. झोमॅटोच्या शेअर्समध्ये गेल्या तीन दिवसात 13 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कालची इंट्रा-डे रॅलीमध्ये झोमॅटोच्या शेअरची किंमत 27 जुलै 2022 रोजीच्या 40.55 रुपये या नीचांकी किमतीच्या तुलनेत 73 टक्के वर गेली आहे. झोमॅटोच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक पातळी किंमत 169.10 रुपये होती. सध्या हा स्टॉक त्याच्या सार्वकालीन उच्चांक पातळी किमतीच्या 76 टक्के खाली ट्रेड करत आहे.
तज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला :
ब्लॉक डील डेटानुसार 3 ऑगस्ट 2022 रोजी अमेरिकन राइड-हेलिंग Uber कंपनीने भारतातील प्रसिद्ध फूड डिलिव्हरी करणारी कंपनी झोमॅटो मधील आपला संपूर्ण 7.78 टक्केचा गुंतवणूक हिस्सा विकला आहे. uber ने वेगवेगळ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांना आपले 612 दशलक्ष शेअर्स 50.44 रुपये प्रति शेअर या किमतीने विकले गेले. फिडेलिटी इन्व्हेस्टमेंट फर्मने झोमॅटो कंपनीचे शेअर uber कडून 274 कोटी रुपयांना खरेदी केले आहेत. ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने 226 कोटी रुपयांचे जास्त शेअर्स आपल्या पोर्टफोलिओ मध्ये जोडले आहेत. 28 सप्टेंबर 2022 रोजी MK ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसने झोमॅटो कंपनीच्या शेअरची लक्ष किंमत 90 रुपये जाहीर करून ‘बाय’ रेटिंग दिली होती आणि स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता.
झोमॅटो बद्दल थोडक्यात :
झोमॅटो कंपनीचा IPO गेल्या वर्षी शेअर बाजारात लिस्ट झाला होता, पण त्यात सातत्याने पडझड होऊ लागली आणि स्टॉक आपल्या सर्वकालीन नीचांकी किमतीवर आला होता. झोमॅटोच्या IPO ने शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री केली होती, पण शेअर मधील वाढ जास्त काळ टिकून राहिली नाही. NSE निर्देशांकावर शेअर 76 रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत 116 रुपये किमतीवर लिस्ट झाला होता. एकूणच झोमॅटोचा शेअरची IPO मध्ये ओपनिंग 52.63 टक्क्यांच्या वाढीसह झाली होती. 31 डिसेंबर 2021 रोजी संपलेल्या तिमाहीत झोमॅटो कंपनीचा एकूण तोटा 63 कोटी रुपये होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.