19 April 2024 6:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 19 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल KPI Green Energy Share Price | अवघ्या 6 महिन्यात 209% परतावा देणारा शेअर वेळीच खरेदी करा, मोठा फायदा होईल Dynacons Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर, अल्पावधीत दिला 4300 टक्के परतावा, हा स्टॉक खरेदी करणार? Stocks To Buy | असे शेअर्स निवडा! अवघ्या एका महिन्यात दिला 90 टक्के परतावा, दोन शेअर्स मालामाल करतील Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 19 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Patel Engineering Share Price | 1 वर्षात 300% परतावा देणारा 59 रुपयाचा शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर PSU Stocks | सरकारी कंपनीचा शेअर तेजीत, अल्पावधीत दिला 85 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
x

Gold Price Today | सोनं आणि चांदीच्या दरात अचानक मोठा बदल झाला, तपासून घ्या आजचे नवे दर

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या आठवड्यातील घसरणीनंतर या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. लग्नसराईत सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सोन्याचे दर 52,662 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. पण या आठवड्यात हा आकडा 53 हजार रुपयांच्या पार गेला आहे. शुक्रवारी या आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग डेला सोन्याचे दर 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. बऱ्याच कालावधीनंतर सोन्याच्या भावाने 53 हजार रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिवाळीच्या वेळीही सोन्याचा भाव ५० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या आसपास होता.

या आठवड्यात सोन्याचे दर
सोमवारी सोन्याचे दर 52,673 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. मंगळवारी भावात आणखी वाढ झाली आणि ते 52,715 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. बुधवारी ते 52,751 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. गुरुवारी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आणि तो ५३ हजारांचा टप्पा ओलांडून ५३,१२० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला. शुक्रवारी सोन्याचे दर 53,611 रुपयांवर बंद झाले.

सोनं किती महाग?
आयबीजेएच्या दरांनुसार, गेल्या आठवड्यात सोन्याचे दर मागील आठवड्यातील शेवटच्या ट्रेडिंग डेला शुक्रवारी 52,662 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. शुक्रवारी (2 डिसेंबर 2022) या आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 53,611 रुपये होता. अशाप्रकारे या आठवड्यात सोन्याच्या दरात 949 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढ झाली आहे.

२४ कॅरेट सोन्याचा भाव
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (आयबीजेए) मते, २ डिसेंबरला २४ कॅरेट सोन्याचा भाव ५३,६११ रुपये होता. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,953 रुपये होता. या आठवड्यात 22 कॅरेट सोन्याचा दर 53,441 रुपये आहे. सर्व प्रकारच्या सोन्याचा दर कर न लावता मोजण्यात आला आहे. सोन्यावरील जीएसटी शुल्क वेगळे भरावे लागते. याशिवाय दागिन्यांवर मेकिंग चार्जही असतो.

मार्च महिन्यात सोनं होतं सर्वात महाग
यावर्षी मार्च महिन्यात सोन्याचे दर 54,330 रुपये होते, जो या वर्षातील आतापर्यंतचा सर्वाधिक भाव आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली होती. लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करणार असाल तर दुकानात खरेदी करताना त्याची शुद्धता नीट तपासून पाहा. नेहमी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) हॉलमार्कसह प्रमाणित सोने खरेदी करा. सरकारने आता ते बंधनकारक केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 03 December 2022.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x