 
						Gold Price Today | जर तुम्हीही सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आज तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याचा भाव 55000 रुपयांच्या जवळपास आहे. सोन्याच्या दरात आज विक्रमी पातळीवरून 3500 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. तर चांदीचा भाव 63800 रुपयांच्या जवळपास दिसत आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. जाणून घेऊयात आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय झाला आहे.
सोनं 3500 रुपयांनी स्वस्त
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचा भाव 0.16 टक्क्यांनी घसरून 55,342 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर होता. या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58,882 रुपयांवर पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात 3500 रुपयांपेक्षा जास्त घसरण पाहायला मिळत आहे.
चांदीचा दर देखील स्वस्त झाला
एमसीएक्सवरही आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचा भाव आज 1.10 टक्क्यांनी घसरून 63821 रुपये प्रति किलोग्रॅम वर व्यवहार करत आहे. आज चांदीच्या दरात 2250 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्थिती काय आहे?
आंतरराष्ट्रीय बाजारात एका महिन्यात सोन्यात 111 डॉलर म्हणजेच जवळपास 5.75 टक्क्यांची करेक्शन पाहायला मिळाली आहे. चांदीमध्ये 2.82 डॉलर म्हणजेच जवळपास 12 टक्क्यांची वाढ झाली आहे.
सोने खरेदी करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा
जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
येथे पहा दर
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		