
Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स मागील 6 महिन्यांत 3000 रुपये घसरले आहेत. यामुळे कंपनीच्या गुंतवणुकदारांना जबरदस्त नुकसान सहन करावे लागत आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मुल्य 20,000 रुपयांपेक्षा कमी झाले आहे.
शेअरची 52 आठवड्यांची पातळी
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 4000 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 633.35 रुपये होती. मागील 6 महिन्यांत अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3612.40 रुपये वरून 81 टक्क्यांनी घसरून 700 रुपयेच्या खाली आले आहे. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 2.95 टक्के घसरणीसह 673.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
अदानी टोटल गॅस शेअर मागील 1 महिन्यात 26.98 टक्के घसरले
हिंडेनबर्ग फर्मचा अहवाल येण्यापूर्वी 23 जानेवारी रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3901.10 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 26.98 टक्के घसरले आहेत. मागील 5 दिवसांत हा स्टॉक 8.91 टक्के कमजोर झाला आहे. अदानी टोटल गॅस स्टॉक रिस्क मीटरवर 79 टक्के गुणांसह अत्यंत जोखीम असलेला स्टॉक मानला जात आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे स्टॉक खूप धोकादायक ठेऊ शकतात.
अदानी टोटल गॅस कंपनीच्या मार्च तिमाही निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. वाढत्या नफ्याच्या मार्जिनसह कमी कर्ज यांमुळे कंपनीने चांगला नफा कमावला आहे. अदानी टोटल गॅस स्टॉक्स झिरो प्रमोटर प्लेज वीकनेससह कंपनी मागील 2 वर्षांपासून सकारात्मक कामगिरी करत आहे. मध्यम ते कमी ट्रेंड मोमेंटम स्कोअर सर्वात कमी नोंदवला गेला आहे.
म्युच्युअल फंडांनी होल्डिंग कमी केली
म्युच्युअल फंडांनी ही मागील तिमाहीत त्यांचे होल्डिंग कमी केले आहे. मागील 2 वर्षांत कंपनीच्या ROCE मध्ये घट झाली आहे. मागील 2 वर्षात कंपनीच्या ROA मध्ये देखील घसरण पहायला मिळत आहे. तर नफा मार्जिनसह निव्वळ नफ्यात देखील घट झाली आहे. मागील 2 तिमाहीत कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे.
स्टॉक मूल्यांकन पाहता स्टॉकला 100 पैकी 6 गुण मिळाले आहेत
मागील 1 महिन्यात अदानी टोटल गॅस स्टॉक 26.98 टक्के कमजोर झाला आहे. स्टॉक किंमत अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन सरासरी किमतीपेक्षा कमी आहे. MACD निर्देशांकाने 52-आठवड्याच्या उच्चांकावरून सर्वात मोठी घसरण नोदवली आहे. MACD इंडेक्स सिग्नल लाईनच्या खाली आली आहे.
कंपनीच्या लेखापरीक्षकांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर कमकुवत तांत्रिक आणि शेअरच्या किमतीत घसरण, या आघाडीवर स्टॉक 66 अंकांच्या जवळ ट्रेड करत आहे. स्टॉक मूल्यांकन पाहता स्टॉकला 100 पैकी 6 गुण मिळाले आहेत, तर 16 गुण तांत्रिक बाबीवर मिळाले आहेत.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.