 
						Gold Rate Today | सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही आज दागिने खरेदी करणार असाल तर त्याआधी लेटेस्ट दर नक्की तपासून पाहा. गेल्या काही काळापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. तर मंगळवारी (22 ऑगस्ट) सोन्याचा भाव 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर चांदी स्वस्त झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव काय आहे.
आज एमसीएक्स वरील नवीनतम दर
मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजमध्ये सोन्याचा भाव 0.02 टक्क्यांनी वाढून 58,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. याशिवाय चांदीच्या दरात आज घसरण पाहायला मिळत आहे. चांदीचा भाव आज 0.09 टक्क्यांनी घसरून 71598 रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.
आज सराफा बाजारातील सोन्याचे दर
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 58548 रुपयांवर खुला झाला आहे. तर आदल्या दिवशी तो 58396 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. त्यामुळे आज सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १५२ रुपयांनी घसरला आहे. सध्या सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 3,037 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त आहे. 11 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोने प्रति दहा ग्रॅम ६१५८५ रुपयांवर गेले होते.
काय आहे आज 22 कॅरेट सोन्याची किंमत?
मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,200 रुपये, गुरुग्राममध्ये 54,300 रुपये, कोलकातामध्ये 54,200 रुपये, लखनऊमध्ये 54,300 रुपये, बंगळुरूमध्ये 54,200 रुपये, जयपूरमध्ये 54,300 रुपये, पाटणामध्ये 54,100 रुपये, भुवनेश्वरमध्ये 54,200 रुपये आणि हैदराबादमध्ये 54,200 रुपये आहे.
जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमत
तुम्ही घरबसल्या सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही फक्त 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊन किंमत तपासू शकता. ज्या नंबरवरून तुम्ही मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचा मेसेज येईल.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		