
Gold Rate Today | मागील दोन महिन्यांहून अधिक काळ सोन्या-चांदीच्या दरात मोठी अस्थिरता आहे. मागील सत्रात सोन्याने 61,000 रुपयांचा टप्पा ओलांडला होता. चांदीनेही ७७ हजार रुपयांचा विक्रम ओलांडला. मात्र, त्यानंतर सोनं-चांदीच्या दरात घसरण दिसून आली होती. गेल्या काही दिवसांत ५८ हजार रुपयांचा स्तर गाठल्यानंतर आता सोन्याच्या दरांनी जोर धरला आहे. (Gold Price Today)
आज सोनं-चांदीचे दर किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोनं-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. सराफा बाजारा बरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (एमसीएक्स) सोने-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर आज बुधवारी सोनं 313 रुपयांनी वधारून 59701 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 431 रुपयांनी वधारून 74399 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. याआधी मंगळवारी एमसीएक्सवर सोने 59388 रुपये आणि चांदी 73943 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारात सोन्याचे दर किती?
आयबीजेएच्या https://ibjarates.com अधिकृत संकेतस्थळावर सराफा बाजाराचे दर दररोज जाहीर केले जातात. आज बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात संमिश्र कल दिसून आला. मुंबई पुण्यासह सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 5 रुपयांनी वधारून 59456 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा भाव जवळपास 350 रुपयांनी घसरून 73919 रुपये प्रति किलोग्राम वर आला आहे. याआधी मंगळवारी सोने 59451 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74288 रुपयांवर बंद झाली होती.
तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे दर :
* औरंगाबाद – 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
* भिवंडी – 22 कॅरेट सोने : 55130 रुपये, 24 कॅरेट सोने : 60150 रुपये
* कोल्हापूर – 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 55130 रुपये, 24 कॅरेट सोने : 60150 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोना : 55100 रुपये, 24 कॅरेट सोना : 60110 रुपये
* नागपूर – 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
* नाशिक – 22 कॅरेट सोने : 55130 रुपये, 24 कॅरेट सोने : 60150 रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
* सोलापूर – 22 कॅरेट सोने : 55100 रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
* ठाणे – 22 कॅरेट सोने : ५५१०० रुपये, 24 कॅरेट सोने : 60110 रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.