
Gold Rate Today | गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला विक्रमी वाढ करणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण होत आहे. एकेकाळी सोने 61739 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 77280 रुपये प्रति किलोग्रॅम झाली होती. पण त्यानंतर दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घसरण नोंदवली जात आहे. भाव घसरल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येत्या काळात सोने-चांदीत पुन्हा एकदा तेजी येऊ शकते. (Gold Price Today)
दुपारी चांदीच्या दरात वाढ
आठवड्याच्या अखेरीस मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (एमसीएक्स) आणि सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली. मात्र, दोन्ही बाजारात चांदीचे दर लाल चिन्हांसह ट्रेंड करताना दिसले. दुपारनंतर चांदीच्या दरातही हिरव्या चिन्हांसह घसरण सुरू झाली. मे महिन्याच्या विक्रमी पातळीपेक्षा आतापर्यंत सोन्यात सुमारे ३२०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीमध्ये प्रति किलो सुमारे 8000 रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे.
सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण
सराफा बाजाराचे दर दररोज दुपारी १२ वाजता https://ibjarates.com संकेतस्थळावर जाहीर केले जातात. रविवारी सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 58531 रुपये आणि चांदीच्या भाव 69634 रुपये झाला आहे. चांदीत ११०० रुपयांहून अधिकची घसरण झाली आहे. सोनं 113 रुपयांनी घसरले आहे. याआधी शनिवारी सोने 58644 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 70815 रुपये प्रति किलो वर बंद झाली होती. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 53614 रुपये आणि 20 कॅरेट सोन्याचा भाव 43898 रुपये आहे.
तुमच्या शहरातील आजचे नवे दर :
* औरंगाबाद, २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०७० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
* भिवंडी, 22 ग्रॅम सोने : 54180 रुपये, 24 टक्के सोने : 59100 रुपये, चांदी किंमत : 72300 रुपये
* कोल्हापूर, २२ ग्रॅम सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०७० रुपये, चांदी : ७२३०० रुपये
* लातूर, २२ टक्के सोने : ५४१८० रुपये, २४ टक्के सोने : ५९१०० रुपये, चांदी : ७२३०० रुपये
* मुंबई, 22 टक्के सोने : 54150 रुपये, 24 टक्के सोने : 59070 रुपये, चांदी किंमत : 72300 रुपये
* नागपूर, २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०७० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
* नाशिक, २२ टक्के सोने : ५४१८० रुपये, २४ टक्के सोने : ५९१०० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
* पुणे, 22 टक्के सोने : 54150 रुपये, 24 टक्के सोने : 59070 रुपये, चांदी किंमत : 72300 रुपये
* सोलापूर, २२ ग्रॅम सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०७० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
* ठाणे, २२ टक्के सोने : ५४१५० रुपये, २४ टक्के सोने : ५९०७० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
* वसई-विरार, २२ टक्के सोने : ५४१८० रुपये, २४ टक्के सोने : ५९१०० रुपये, चांदीचा भाव : ७२३०० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.