 
						Gold Rate Today | आज सोमवारी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. अशा वेळी तुम्हाला स्वस्त सोनं खरेदी करण्याची चांगली संधी आहे. आज सोने आणि चांदी दोन्ही स्वस्त झाले आहेत. एमसीएक्सवर सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 58,700 रुपयांवर आला आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोनं स्वस्त झालं आहे. जाणून घेऊयात आज काय आहे 10 ग्रॅम सोन्याचा भाव.. (Gold Price Today)
सोनं आणि चांदी झाली स्वस्त :
मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 0.08 टक्क्यांनी म्हणजेच जवळपास 150 रुपयांनी स्वस्त होऊन 58640 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे. याशिवाय चांदीचा भाव 0.10 टक्क्यांनी घसरून 71239 रुपये प्रति किलो झाला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरातही आज जवळपास २०० रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याचा भाव 2,937 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. सोन्याने 11 मे 2023 रोजी उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोन्याचा भाव 61585 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचला होता.
दिवाळीत सोनं होणार महाग
दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा मोठी तेजी येण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ६२५०० रुपयांच्या पातळीवर पोहोचू शकतो, असे मानले जात आहे. तो आतापर्यंतच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहे. फेडरल रिझर्व्हची भूमिका थोडी नरम राहिल्यास डॉलर निर्देशांक आणि बॉण्ड यील्ड मध्ये घसरण होईल, ज्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर होईल. अशा तऱ्हेने सोन्याचा भावही 64500 पर्यंत पोहोचू शकतो.
अॅपद्वारे अचूकता तपासा
जर तुम्हीही बाजारात सोनं खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅपचा ही वापर करू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’च्या माध्यमातून तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय या अॅपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार करू शकता.
जागतिक बाजारातही सोने आणि चांदी स्वस्त
जागतिक बाजाराचा विचार केला तर येथील सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. येथे सोन्याचा भाव 1927 डॉलर प्रति औंस तर चांदीचा भाव 23.23 डॉलर प्रति औंस दिसून येत आहे.
आज तुमच्या शहरातील सोन्याचे दर :
* औरंगाबाद, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* भिवंडी, 22 कॅरेट सोने : 54480 रुपये, 24 कॅरेट सोने : 59440 रुपये
* कोल्हापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* लातूर, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
* मुंबई, 22 कॅरेट सोना : 54450 रुपये, 24 कॅरेट सोना : 59410 रुपये
* नागपूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* नाशिक, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
* पुणे, 22 कॅरेट सोने : 54450 रुपये, 24 कॅरेट सोने : 59410 रुपये
* सोलापूर, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* ठाणे, २२ कॅरेट सोने : ५४४५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४१० रुपये
* वसई-विरार, २२ कॅरेट सोने : ५४४८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९४४० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		