 
						Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी पातळी गाठल्यानंतर गेल्या काही काळापासून त्यात घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारच्या व्यवहारात सोने आणि चांदी दोन्हीमध्ये किंचित वाढ दिसून आली. सराफा बाजाराबरोबरच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवरही (एमसीएक्स) ही तेजी पाहायला मिळत आहे. तर विक्रमी पातळीवरून खाली घसरून सोने सुमारे 3000 रुपये आणि चांदी 7000 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आता दोन्ही मौल्यवान धातूंचे दर कमी झाल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. (Gold Price Today)
आज एमसीएक्सवर सोन्या-चांदीचा दर किती?
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) बुधवारी सोन्या-चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 46 रुपयांनी वाढून 58819 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 163 रुपयांनी वाढून 71280 रुपये प्रति किलो झाला. याआधी मंगळवारी एमसीएक्सवर सोने 58773 रुपये आणि चांदी 71117 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
आज सराफा बाजारात सोन्याचा दर किती?
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनतर्फे (आयबीजेए) सराफा बाजारातील दर दररोज जाहीर केले जातात. https://ibjarates.com वेबसाईटने बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 21 रुपयांनी वाढून 58887 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, चांदी सुद्धा 62 रुपयांनी वाढून 70880 रुपये प्रति किलोग्राम वर पोहोचली आहे. मंगळवारी सोने 58,866 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 70,800 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. बुधवारी 23 कॅरेट सोन्याचा भाव 58,651 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 44,941 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर पहा
* औरंगाबाद – २२ कॅरेट सोने : ५४६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६२० रुपये
* भिवंडी – २२ कॅरेट सोने : ५४६८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६५० रुपये
* कोल्हापूर – २२ कॅरेट सोने : ५४६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६२० रुपये
* लातूर – 22 कॅरेट सोने : 54680 रुपये, 24 कॅरेट सोने : 59650 रुपये
* मुंबई – 22 कॅरेट सोना : 54650 रुपये, 24 कॅरेट सोना : 59620 रुपये
* नागपूर – २२ कॅरेट सोने : ५४६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६२० रुपये
* नाशिक – २२ कॅरेट सोने : ५४६८० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६५० रुपये
* पुणे – 22 कॅरेट सोने : 54650 रुपये, 24 कॅरेट सोने : 59620 रुपये
* सोलापूर – २२ कॅरेट सोने : ५४६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६२० रुपये
* ठाणे – २२ कॅरेट सोने : ५४६५० रुपये, २४ कॅरेट सोने : ५९६२० रुपये
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		