 
						Gold Rate Today | महिन्याभरात म्हणजे 2024 मध्ये सोने 68000 ते 72000 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. अमेरिकेत अपेक्षेपेक्षा लवकर व्याजदरात कपात होण्याची शक्यता असताना आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर जवळपास सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर आहेत.
भारतातही सोन्याच्या दरांनी उच्चांक गाठला
भारतातही सोन्याने उच्चांक गाठला आहे. गेल्या 15 दिवसांत सराफा बाजारात सोन्याचा स्पॉट भाव 1989 रुपयांनी वाढून 62607 रुपये झाला आहे. चांदीही या काळात 3714 रुपयांनी वधारून 75934 रुपयांवर पोहोचली आहे.
सोन्याने गाठली आतापर्यंतची उच्चांकी पातळी
मागील सत्रात 5 मे नंतरचा उच्चांकी स्तर गाठल्यानंतर गुरुवारी स्पॉट गोल्डचा भाव 2,041.76 डॉलर प्रति औंस होता. मात्र, 29 सप्टेंबररोजी सराफा बाजारात सोन्याने 62775 रुपयांचा उच्चांक गाठला होता. मुंबई, दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये सराफा बाजारात सोनं ६३,५०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विकलं जातंय.
पुढील वर्षी सोने 2,400 डॉलरपर्यंत पोहोचू शकते
केडिया अॅडव्हायजरीचे तज्ज्ञ म्हणाले, ‘सोन्याच्या दरात अस्थिरता लक्षणीय वाढली असून गेल्या काही महिन्यांत सोन्याने दमदार परतावा दिला आहे. आम्ही सोन्याबाबत उत्साही आहोत आणि अस्थिरता कायम राहिल्यास किंमत सुमारे 2,240 डॉलरच्या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा आहे. केडिया अॅडव्हायजरीचे संचालक अजय केडिया म्हणाले, “फंडामेंटल मजबूत राहिल्यास पुढील वर्षी किंमती 2,400 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात असा आमचा अंदाज आहे.
व्याजदर, महागाई, भूराजकीय तणाव, मध्यवर्ती बँकांची खरेदी, जीएससीआय विरुद्ध ईटीएफ मागणी, शेअर्समधील उच्च मूल्यांकन, गोल्ड म्युच्युअल फंडांकडे आकर्षण, जगात सोन्याची वाढती मागणी, अमेरिकन डॉलरचा प्रभाव आणि रुपयातील कमकुवतपणा या प्रमुख घटकांमुळे सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असे केडिया अॅडव्हायझरीयांनी आपल्या अहवालात म्हटले आहे.
व्याजदर कपातीमुळे सोन्याकडे आकर्षण वाढले
सोन्याच्या किंमती अमेरिकेच्या महागाई दराशी निगडित आहेत. जेव्हा व्याजदर कमी असतात तेव्हा सोन्यासारख्या विनाव्याज मालमत्तेचे सापेक्ष आकर्षण वाढते. २०२४ मध्ये व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. कारण, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांनी या आठवड्यात येत्या काही महिन्यांत व्याजदरात कपात होण्याची शक्यता व्यक्त केली आणि विकास दर मंदावण्याची आशा व्यक्त केली.
जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत
जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीला ऐतिहासिक वेग आला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी (ओटीसी वगळून) वाढून १,१४७ टन झाली, जी पाच वर्षांच्या सरासरीपेक्षा ८ टक्क्यांनी अधिक आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या ताज्या अहवालानुसार, मध्यवर्ती बँकांनी वार्षिक आधारावर 800 टन सोन्याची निव्वळ खरेदी केली आहे, जी गेल्या नऊ वर्षांतील सर्वाधिक आहे.
सोन्याच्या चमक आणि महागाई
यापुढेही महागाई कायम राहील, ज्यामुळे सोन्याच्या किमतींना आधार मिळेल, असा विश्वास केडिया यांनी व्यक्त केला. मात्र, महागाईच्या काळात सोन्याच्या दरात चढ-उतार होऊ शकतात.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		