12 December 2024 3:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, 8'व्या वेतन आयोगाचे संकेत, एकूण पगार व पेन्शनमध्ये वाढ होणार - Marathi News

Highlights:

  • 8th Pay Commission
  • सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये होणार वाढ
  • आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता
  • रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव लाभ
  • सातव्या वेतन आयोगात करण्यात आले हे बदल
8th Pay Commission

8th Pay Commission | आठवा वेतन आयोग लवकरच येईल, अशी आशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. सध्या तरी सरकारने आठव्या वेतन आयोगाबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. सरकारी कर्मचाऱ्यांबाबत दर दहा वर्षांनी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जातात.

शेवटचा म्हणजे 7 वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ झाली. आता आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यासंबंधीची आवश्यक माहिती तुम्हाला देऊया.

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये होणार वाढ
यामुळे त्यांच्या पगारात पुन्हा लक्षणीय वाढ होईल, अशी आशा कर्मचाऱ्यांना आहे. आठव्या वेतन आयोगात कर्मचारी संघटनेची मागणी मान्य झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18 हजार रुपयांवरून 34,560 हजार रुपये आणि किमान पेन्शन 17,280 हजार रुपये होऊ शकते.

आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधानांच्या यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जानेवारी 2026 पर्यंत आठवा वेतन आयोग जाहीर करू शकते.

ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनसारख्या कर्मचारी संघटना सरकारशी नियमित संवाद साधून कर्मचाऱ्यांच्या मागण्या मांडतात. पण अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच आठव्या वेतन आयोगाबाबत मोठं पाऊल उचलू शकतं, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि महागाई लक्षात घेता वेतनवाढ जाहीर करणे हा सरकारसाठी महत्त्वाचा निर्णय ठरू शकतो.

रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव लाभ
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास त्याचा फायदा रेल्वे कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. त्यामुळे त्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

सातव्या वेतन आयोगात करण्यात आले हे बदल
सातव्या वेतन आयोगाच्या वेतनवाढीचा विचार केला असता कर्मचारी संघटनांनी 3.68 फिटमेंट फॅक्टरची मागणी केली होती, पण सरकारने 2.57 फिटमेंट फॅक्टरचा निर्णय घेतला. किमान मूळ वेतन दरमहा 18,000 रुपये झाले, तर सहाव्या वेतन आयोगात ते सात हजार रुपये होते. किमान पेन्शनही 3,500 रुपयांवरून 9,000 रुपये करण्यात आली. यासह जास्तीत जास्त वेतन 2,50,000 रुपये आणि जास्तीत जास्त पेन्शन 1,25,000 रुपये होते.

आठवा वेतन आयोग लागू झाल्याने एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शन लाभांवर परिणाम होणार आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

Latest Marathi News | 8th Pay Commission 26 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#8th Pay Commission(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x