HDFC Silver ETF | एचडीएफसी म्युच्युअल फंडाने लाँच केला सिल्व्हर ETF फंड, चांदीमध्ये गुंतवणूक करून मिळवा भरघोस परतावा

HDFC Silver ETF | सेबीने मागील वर्षी सिल्व्हर ईटीएफ मधील गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. फंड हाऊसच्या मते, एखाद्या व्यक्तीसाठी प्रत्यक्ष चांदीमध्ये गुंतवणूक करणे आणि ते सुरक्षितपणे ठेवणे कठीण जाते. परंतु HDFC सिल्व्हर ईटीएफ मधील गुंतवणूकदारांना चांदीमध्ये डिजिटल स्वरूपात गुंतवणूक करण्याची संधी मिळते.
ठळक मुद्दे :
* गुंतवणूकदारांना सिल्व्हर ईटीएफद्वारे चांदीमध्ये डिजिटल गुंतवणूक करण्याची संधी
* सेबीने मागील वर्षी सिल्व्हर ईटीएफसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लि. ने सिल्व्हर एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजेच सिल्व्हर ईटीएफ लाँच केले आहे जे एक ओपन-एंडेड गुंतवणूक योजना आहे. 18 ऑगस्ट 2022 रोजी HDFC सिल्व्हर ETF फंड गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या योजने मध्ये 26 ऑगस्टपर्यंत सिल्व्हर ईटीएफमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येईल.
फंड हाऊसच्या मते, एखाद्या व्यक्तीसाठी प्रत्यक्ष चांदीमध्ये गुंतवणूक करणे आणि ते सुरक्षित रीतीने ठेवणे कठीण जाते, परंतु एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना बाजाराच्या व्यवहार वेळेत चांदीमध्ये डिजिटल गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देते. आणि गुंतवणूक व्यवहार सहज करता येते.
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिलिमिटेडचे संचालक म्हणतात की, “एचडीएफसी एएमसीने नेहमीच गुंतवणूकदार प्राथमिकता दिली आहे आणि जो दृष्टिकोन आमच्या ग्राहकांसाठी योजना लॉन्च करताना सर्वात प्रभावी फायदा प्रदान करतो. हा ETF फंड आपल्या गुंतवणूकदारांना विविध जोखीम क्षमता असलेल्या धातूंमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देतो तसेच आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता वाढवण्याची संधी उपलब्ध करून देतो.
सिल्व्हर ईटीएफ बद्दल सविस्तर :
सोन्याव्यतिरिक्त, कोणीही ईटीएफद्वारे चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करू शकतो. या योजने अंतर्गत तुम्हाला शेअर्सप्रमाणे चांदीमध्येही गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होते. गुंतवणूकदारांना ETF च्या माध्यमातून प्रत्यक्ष चांदीमध्ये गुंतवणूक करण्याची गरज नाही,. या अंतर्गत गुंतवणूकदार सिल्व्हर ईटीएफ डिजिटल पद्धतीने पैसे गुंतवू शकतत.
मागील वर्षी, म्युच्युअल फंड कंपन्यांना सिल्व्हर ईटीएफ गुंतवणूक फंड सुरू करण्याची परवानगी दिली गेली. बाजार नियामक मंडळ सेबीच्या मंजुरीनंतर, गुंतवणूकदारांना आता जास्त पैसे कमविण्याचा आणखी एक नवीन मार्ग मिळाला आहे. सेबीने मागील वर्षी सिल्व्हर ईटीएफ फंडसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करून लोकांना चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| HDFC Silver ETF investment opportunities and benefits on 24 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL