12 December 2024 10:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC
x

उद्धव ठाकरेंची उंची मोदींएवढी नाही: किरीट सोमय्या

Uddhav Thackeray, Shivsena, Former MP Kirit Somaiya, BJP

नाशिक: जळगाव येथील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा फोटो न लावण्यावरून भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोंदीची उंची मोठी आहे, त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला असतो. त्यांची उद्धव ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेला लगावला. लोकसभा निवडणुकीत मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महायुतीला मते मिळाल्याचे सांगत शिवसेनेला सोमय्या यांनी डिवचले आहे.

तसेच राज ठाकरेंसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काही खरे नाही. हा पक्ष अदृश्य झाला आहे. काँग्रेसला राष्ट्रीय नेता मिळतं नाही, तर मुंबईचे अध्यक्षपद घ्यायला कोणी तयार नाही. राष्ट्रवादीत शरद पवार यांच्या मागे राहणारे दुसऱ्या दिवशी इतर पक्षात दिसतात. त्यामुळे विरोधी पक्ष संपुष्टात आले आहेत.

त्या संपूर्ण घोटाळ्याबाबत राज्य सरकारने समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखाना खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित पवार यांचे नावदेखील असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.

शिवसेनेला मानसन्मान न देता गृहीत धरले जाते का? या प्रश्नावर भूमिका मांडताना महायुतीमधील सर्व पक्षांना सन्मानाची वागणूक दिली जाते. मात्र, पंतप्रधान पदाबाबत काही प्रोटोकॉल पाळावे लागतात, असेही त्यांनी सांगितले. ईडीच्या अहवालात शरद पवार यांचे नाव आल्याने दु:ख झाल्याचे कारण सांगत अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा झाली. मात्र, या प्रकरणातील ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच राजीनामा नाट्यामागील खरे नाट्यदेखील उलगडले जाईल, असे संकेतदेखील सोमय्या यांनी दिले.

दरम्यान, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेविरोधात अनेक ठेवीदारांनी बँक व्यवस्थापकाविरोधात तक्रार केलेली असताना भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही पीएमसी बँकेविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी विनंती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) यांच्याकडे केली आहे. मात्र स्वतःच्या पक्षाशी संबंधित लोकं त्यात सामील असल्याचे त्यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता त्यांनी मुंबई आरबीआय कार्यालयाकडून पळ काढला होता.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x