29 September 2020 2:44 AM
अँप डाउनलोड

चंद्रकांत पाटील भाजप प्रदेशाध्यक्षपदी कायम, मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा

Chanddrakant Patil, Mangal Prabhat Lodha

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी ही घोषणा केली. चंद्रकांत पाटील महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद सांभाळतील, तर आमदार मंगलप्रभात लोढा यांनाही पुन्हा मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आलं आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

राज्यातील विधानसभा निवडणुका अगोदर या दोघांनाही पक्षाच्यावतीने ही जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांची पुन्हा निवड केली गेली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून देऊ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यातील मागील विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला म्हणावे, तसे यश मिळवता आले नाही. तरीही भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, चंद्रकांत पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. तर, दुसरीकडे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगलप्रभात लोढा यांच्याऐवजी आशिष शेलार यांच्याकडे मुंबई भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद देण्याची चर्चा होती. मात्र, मंगलप्रभात लोढा यांनाच मुंबई अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

 

Web Title: BJP Leader Chandrakant Patil retains position of BJP Maharashtra President and MLA Mangal Prabhat Lodha as a Mumbai BJP President.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(66)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x