30 April 2024 4:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर NBCC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 265% परतावा, स्टॉक चार्ट काय संकेत देतोय? Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, तज्ज्ञांकडून स्टॉकची सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा शेअर, अवघ्या 2 दिवसात दिला 40 टक्के परतावा, खरेदी करणार?
x

विरोधक व नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा सामनाच्या अग्रलेखात नेहमीची 'फॅशन' असा उल्लेख

Uddhav Thackeray, Shivsena

मुंबई : मागील २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या पावसामुळे मुंबईतील पायाभूत सुविधांचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे पाहायला मिळाले. तसेच पावसाळ्यापूर्वी करोडो रुपये खर्चून १०० टक्के नालेसफाई करण्यात आल्याचा दावा देखील शिवसेनेने सामना वृत्तपत्रातून केला होता. कालच विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आणि त्यामध्ये मुंबई महापालिकेतील कारभाराची तसेच नालेसफाई आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढण्यात आले होते. दरम्यान, पायाभूत सुविधा कोलमडल्याने विरोधकांपासून ते सामान्य नागरिकांनी सत्ताधारी शिवसेनेवर संताप व्यक्त करत, मागील २५-३० वर्ष शहरात सत्तेत असून देखील इथल्या पायाभूत सुविधा जैसे थे असल्याचा आरोप अनेक सामान्य लोकांनी देखील केला आहे.

मुंबईतील २-३ दिवसांच्या धुवाधार पावसाने मुंबईचे जनजीवन मंगळवारी ठप्प केले. संपूर्ण जून महिन्याची सरासरी पावसाने फक्त २४ तासांत ओलांडल्यावर दुसरे काय होणार? एखाद्या दुर्घटनेचे राजकारण करण्याचे ‘गजकरणी’ प्रकार धोकादायक आहेत. प्रचंड कोसळणारा पाऊस मालाडसारख्या जीवघेण्या दुर्घटनांचा दगाफटका देतो. धोकादायक इमारती, ‘संरक्षक’ भिंती हे दरवर्षी निरपराधांसाठी ‘पावसाळय़ातील यमदूत’ का ठरावेत? असं सांगत अहमदाबाद काय, नागपूर काय या शहरांमध्येही ही स्थिती उद्भवली आहेच. पण मुंबईत काही खुट्ट जरी घडले तरी त्यासाठी शिवसेना आणि मुंबई महापालिका यांना जबाबदार धरण्याची जुनीच ‘फॅशन’ आहे असा टोला सामना संपादकीयमधून विरोधकांसह सामान्य नागरीकाकांना देखील लगावला आहे.

पावसाळय़ात मुंबईकरांचे रुटीन सुरळीत राहावे, दुर्घटना घडू नयेत यासाठी मुंबई महापालिका आणि प्रशासन योग्य ती काळजी दरवर्षीच घेत असते. मुंबई महापालिकेने या २–३ दिवसांत उत्तम काम केले. कर्मचारी वर्ग दिवसरात्र शर्थ करून तुंबलेले पाणी समुद्रात सोडत होते असं देखील सामनाच्या संपादकीय मध्ये म्हटले आहे. दरम्यान, शहरातील दर वेळच्या पावसाळ्यात नागरिकांचे हेच हाल असतात आणि हा केवळ १-२ दिवसाचा प्रश्न नाही हा सेनेला देखील विसर पडल्याचे जाणवते आहे. केवळ विरोधकच नव्हे तर कर भरणाऱ्या सामान्य नागरिकांनी देखील सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचे नाहीत असाच शिवसेनेचा एकूण तोरा असल्याचं जाणवतं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x