30 April 2025 1:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉकमध्ये तेजीचे संकेत; मिळेल मजबूत परतावा - NSE: ADANIPOWER
x

राज ठाकरेंच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या लोकांना भाजप सरकार त्रास देत आहे? मनसेचा आरोप

BJP, MNS, BJP Maharashtra, devendra fadnavis, raj thackeray

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या सभा महाराष्ट्रभर नाही तर देशभर गाजत आहेत. एक वेगळ्याच प्रकारे व्हिडिओ प्रेझेंटेशन देऊन राज ठाकरे सध्या भाजप सरकार तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहांची पोलखोल करत आहेत. या पोलखोल दरम्यान राज ठाकरेंनी बरेचसे व्हिडिओ दाखवले आहेत आणि या व्हिडिओ मधून बरेचसे चेहरे महाराष्ट्राला नव्याने कळले.

राज ठाकरेंच्या सभेतील १ चेहरा म्हणजे हरिसाल डिजिटल इंडिया मधील तो मॉडेल. राज ठाकरेंनी पुण्याच्या सभेत त्या मॉडेलला मनसेच्या मंचावर आणून भाजपच्या थोबाडितच मारली. त्या मुलाला त्याचा काय लाभ झाला ते माहित नाही, तो मुलगा सध्या पुणे-मुंबई मध्ये नोकरीसाठी वणवण फिरत आहे. त्याच्याकडे साधं स्वाईप मशीन सुद्धा नाही. त्याच्यामते “मी कसला लाभार्थी आहे हे सरकारलाच माहित”.

आज शिवडी येथे मनसेच्या आयोजित सभेत बोलताना मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस हे पोलिसांचा गैर उपयोग करून व्हिडिओतील लोकांना त्रास देत आहेत. ती लोकं कंटाळून आत्महत्येची भाषा करत आहेत. परंतु त्यांचं कुटुंबच नाही तर संपूर्ण मनसे परिवार आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे.

अशाप्रकारे सर्वसामान्य लोकांना सत्तेचा वापर करून त्रास देणे कितपत योग्य आहे? अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्र आजिबात खपवून घेणार नाही.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या