29 March 2024 7:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 मार्च 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 29 मार्च 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या HDFC Mutual Fund | पगारदारांनो! येथे पैसा गुंतवा, या 3 म्युच्युअल फंड योजनेत 1000 टक्क्याहून अधिक परतावा मिळेल Lloyds Enterprises Share Price | शेअरची किंमत 27 रुपये! अल्पावधीत 2337% परतावा दिला, करोडोत कमाई करणार? Gravita Share Price | शेअर असावा तर असा! 4 वर्षांत दिला 2700% परतावा, आता अल्पावधीत 29% परतावा देईल HLV Share Price | 26 रुपयाचा शेअर करतोय मालामाल, अल्पावधीत 650% परतावा, पुन्हा अप्पर सर्किटवर Adani Green Share Price | अदानी ग्रीन शेअर चार्टवर मोठे संकेत, शेअरमध्ये बंपर तेजी येणार, किती फायदा होईल?
x

उशीरच झाला! जमिनीवरील नेते शरद पवार आता डिजिटल तंत्राचा वापर करणार

Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : मागील काही वर्षांपासून राजकीय क्षेत्रातही समाज माध्यमांचं महत्त्व वाढलं आहे. याद्वारे नेते थेट आपल्या कार्यकर्त्यांसोबत जोडले जातात. याच विषयाला नुसरून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या फेसबुक पेजवरून तरुणांशी संवाद साधणार आहेत. शरद पवार ९ जून रोजी सकाळी अकरा वाजता शरद पवारां त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर LIVE असणार आहेत.

समाज माध्यमांचा वापर करून भारतीय जाणत पक्षाने आपला जनाधार वाढवण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी समाज माध्यमं अत्यंत प्रभावीपणे वापरली असतील तर ती भारतीय जनता पक्षाने, मात्र इतर पक्ष त्यातुलनेत कमी पडल्याचे म्हणावे लागेल. याचा त्यांना निवडणुकीत मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी काळात असा फटका बसू नये म्हणून शरद पवार यांनी हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

कोणत्या मुद्द्यांवर शरद पवार साधणार संवाद?

  1. एनसीपी पक्षाचा १० जून रोजी वर्धापन दिन आहे. त्याआधी होणाऱ्या या संवादात शरद पवार पक्षाच्या ध्येय-धोरणाविषयी बोलण्याची शक्यता आहे. तसंच ते फेसबुकवरून राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावनाही जाणून घेणार आहेत.
  2. सध्या राज्यभरात भीषण दुष्काळाची स्थिती आहे. काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली असली तरीही अनेक भागात अजूनही तीव्र पाणीटंचाई आहे. याबाबतही शरद पवार लोकांच्या भावना जाणून घेतील.
  3. दरम्यान, फेसबुक पेजवरून शरद पवार हे सर्वसामान्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर देणार आहेत. लोकांनी आपल्या नाव-गावासह प्रश्न विचारावेत. त्यातील निवडक प्रश्नांना शरद पवार उत्तर देतील, असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x