14 December 2024 12:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट नोट करा - NSE: HAL Horoscope Today | आजचा दिवस या 5 राशींसाठी असेल अत्यंत खास; दिवसभर बरसेल देवीची कृपा, पहा यामधील तुमची रास Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, ही संधी गमावू नका, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत - NSE: RELIANCE Tata Group IPO | पैसे तयार ठेवा, टाटा गृपचा IPO येणार, अशी संधी सोडू नका, अनेक पटीने पैसा वाढेल - IPO GMP 8th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट, किमान आणि कमाल वेतनबाबत निर्णय होणार Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC
x

मनसेत संभ्रम वाढला; औरंगाबाद मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण वंचित आघाडीच्या वाटेवर

MNS Chief Raj Thackeray, MNS, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई : मागील लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत लोकसभा निवडणूक लढविणार की नाही याचा पदाधिकाऱ्यांना सुगावा लागला नव्हता आणि कार्यकर्ते व पदाधिकारी तयारीला लागलेले असताना अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचं जाहीर केलं. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यात देखील पक्षाध्यक्षांच्या निर्णयाला मान देत निर्णय मान्य केला आणि आदेशाप्रमाणे कामाला देखील लागले.

विशेष म्हणजे आमचं लक्ष दिल्लीपेक्षा महाराष्ट्र आहे असं सूचित करणारे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत जोमाने उतरून कामाला लागतील अशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. वास्तविक काही महिन्यापूर्वी राज ठाकरे यांनी राज्यभर पक्षविस्ताराच्या अनुषंगाने दौरे केले होते. अगदी कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र अशा सर्वच भागांचा त्यात समावेश होता. या दौऱ्यात अनेक पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका देखील झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईमध्ये काही ठिकाणी विधानसभा कार्यालयांची उदघाटन केली आहेत, त्यामुळे त्यातून पक्ष विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचं एकप्रकारे सूचित होतं.

मात्र मागील महिन्याभरापासून सर्वत्र विधानसभा निवडणुकीवरून संभ्रम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे नक्की विधानसभा निवडणूक लढविणार की पुन्हा आयत्यावेळी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेणार ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना समजत नसल्याने ते विचारात पडले आहेत. त्यामुळे आयत्यावेळी गोंधळ नको म्हणून अनेकांनी इतर पक्षाचे पर्याय चाचपडायला सुरुवात केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आणि त्यात नाशिकमधील देखील पदाधिकारी असल्याचे समजते.

अनेक पदाधिकाऱ्यांनी मागील ३-४ वर्षांपासून तयारी सुरु केली होती आणि त्यासाठी पैसा देखील खर्च केला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अजूनही पक्षाची भूमिका स्पष्ट नसल्याने, मनसे पदाधिकारी धास्तावले असल्याचं समजतं. अनेकांनी वरिष्ठांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र काहीच स्पष्टता मिळत नसल्याने अनेकांनी राजकीय अस्तित्व संपुष्टात येण्याच्या भीतीने पडद्याआड इतर पक्षांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. त्याची सुरवात औरंगाबाद पासून सुरु झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव मनसेचे जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण हे वंचित बहुजन आघाडीच्या वाटेवर आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मनसेचे पदाधिकारी पर्याय शोधत असल्याचे बोलले जात आहे.

त्यात आचारसंहिता लागायला अवघे १०-१२ दिवस शिल्लक राहिले असताना सुद्धा, राज ठाकरे यांची भूमिका अजूनही स्पष्ट होऊ न शकल्याने मनसे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अगदी समाज माध्यमांवर देखील त्याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे. त्यात वरिष्ठ पातळीवरील नेते देखील शांत असल्याने संभ्रम बळावला असून, निदान आपण विधानसभा निवडणूक लढविणार आहोत हे तरी जाहीर केलं तरी सर्व संभ्रम दूर होईल असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. वरिष्ठांनी आम्हाला इतकही गृहीत धरू नये अशी अनेकांनी तीव्र भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर असून अनेकजण पर्यायाच्या शोधात असल्याचे दिसत आहे.

त्यातच नुकतेच औरंगाबादमध्ये जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांनी पदाचा राजीनामा दिला असून, त्यापाठोपाठ आता अजूनही काही पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याचा तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वेळीच राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर पक्षातील नेते स्वतःचं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी पर्याय शोधतील अशी चर्चा पाहायला मिळत आहे. काही वर्षांपूर्वी ‘हा आपला शेवटचा पराभव’ असा संदेश देणारे मनसे अध्यक्ष सर्व विषय गुपित का ठेवतात हे कार्यकर्त्यांच्या समजण्यापलीकडे झालं आहे असंच वातावरण आहे. जर कोणत्याही निवडणूक लढवायच्याच नसतील आणि आम्ही छोटे कार्यकर्ते असल्याने आम्हाला कोणतीही कल्पना द्यायचीच नाही असं ठरवलं असेल तर आम्ही राजकारणासाठी स्वतःचा वेळ वाया का घालवावा असा प्रश्न अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित केला. भाजप, शिवसेनेने आणि राष्ट्रवादीने यात्रांच्या माध्यमातून राज्य ढवळून काढालं असताना आपण केवळ त्यावर समाज माध्यमांवर प्रतिक्रिया नोंदवत होतो असं देखील अनेकांनी म्हटलं आहे. शिवाय सध्या पक्ष मूळ प्रचारापेक्षा धक्कातंत्र अवलंबत असेल तर ते दिवस गेल्याची भावना देखील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ‘राज साहेब लवकर निर्णय घ्या अन्यथा उशीर होईल’, अशी भावना मनसेचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x