19 January 2022 12:39 AM
अँप डाउनलोड

पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील | तो परिपक्वच आहे

BJP MP Narayan Rane, Parth Pawar, Sharad Pawar

मुंबई, १६ ऑगस्ट : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार याची पक्षाविरोधात भूमिका घेतल्यामुळे चांगलीच कानउघडणी केली होती. त्यानंतर पवार कुटुंबात आणि राष्ट्रवादी पक्षात हालचालींना वेग आला होता. अखेर, पार्थ यांची समजूत काढण्यासाठी बारामतीत पवार कुटुंबीयांची बैठक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी शनिवारी रात्री काका श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पोहोचले होते. अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात उशिरा रात्री ही बैठक झाली. यावेळी काका श्रीनिवास पवार यांनी पार्थ यांची समजूत काढली. या बैठकीला खुद्द अजित पवार उपस्थितीत होते. तसंच अजितदादा, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची संयुक्तिक चर्चा झाली.

एकाबाजूला अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारलं होतं. मात्र, भाजपाचे नेते खासदार नारायण राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. पार्थ १८ वर्षांचा आहे. त्याने लोकसभा निवडणूक लढवली आहे. तो परिपक्वच आहे,” अशी भूमिका राणे यांनी मांडली.

नारायण राणे यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणासह पार्थ पवार यांच्याबद्दल भाष्य केलं. पार्थ पवार यांच्याबद्दल बोलताना खासदार राणे म्हणाले, “पार्थ पवार १८ वर्षाचा आहे. तो राजकारणात आहे. त्याशिवाय त्याने निवडणुकही लढवली आहे. त्यामुळे तो परिपक्वच आहे. पार्थने केलेल्या मागणी मागे त्याचे स्वतःचे म्हणून काही विचार असतील. त्यामुळेच त्याने हे विधान केलं असेल,” असं म्हणत राणे यांनी पार्थ पवार यांची पाठराखण केली.

 

News English Summary: BJP leader MP Narayan Rane has followed Parth Pawar. Parth is 18 years old. He has contested the Lok Sabha elections. Rane said that he is mature.

News English Title: BJP MP Narayan Rane Reaction On Parth Pawar After Sharad Pawar Criticize Him News Latest Updates.

हॅशटॅग्स

#ParthPawar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x