1 May 2025 1:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | 461 टक्के परतावा देणारा एनटीपीसी स्टॉक पुन्हा फोकसमध्ये, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NTPC HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO RVNL Share Price | पीएसयू शेअर पुन्हा सुसाट तेजीने परतावा देणार, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL IREDA Share Price | मल्टिबॅगर शेअर मालामाल करणार, स्वस्तात खरेदी करा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: IREDA GTL Infra Share Price | पेनी स्टॉक 52-वीक लो लेव्हलच्या जवळ; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: GTLINFRA Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे

Sushant Singh Rajput, minister Aaditya Thackeray, Disha Salian

मुंबई, ४ ऑगस्ट: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेच्या तपासावरून आरोप होताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.

यापूर्वी देखील भाजप तसेच चित्रपट श्रुष्टीतील अनेकांनी आदित्य ठाकरे यांना याच प्रकरणावरून लक्ष केलं आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर हाच विषय ट्रेंडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी त्यांनी समाज माध्यमांवर एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.

याबाबत आदित्य ठाकरे म्हणतात की, सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे, ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. मुळात या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे एक महत्त्वाचे अंग आहे. या उद्योगावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. त्यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध नक्कीच आहेत हा काही गुन्हा नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू तितकाच धक्कादयक आहे, मुंबई पोलीस खोलवर तपास करत आहे. पण ज्यांचा कायद्यावर विश्वास नाही तेच लोक याप्रकरणी फालतू आरोपांचा धुरळा उडवीत तपास भरकटवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी हिंदूह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू म्हणून सांगतो, महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असं कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, फालतू आरोप करणाऱ्यांनी हे समजून घेतले पाहिजे. या प्रकरणाची कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांनाच घ्यायला हवी. पोलीस नक्कीच त्या दिशेने तपास करतील, या प्रश्नी मी आजही संयमानेच वागत आहे, अशाप्रकारे चिखलफेक करुन सरकार आणि ठाकरे कुटुंबाची बदनामी करता येईल या भ्रमात कोणी राहू नये तूर्त इतकेच अशा शब्दात शिवसेना मंत्री आदित्य ठाकरेंनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

 

News English Summary: Minister Aaditya Thackeray says that in the case of Sushant’s suicide, he and his family are being slandered unnecessarily.

News English Title: Case Sushant Singh Rajput minister Aaditya Thackeray finally make a statement News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या