23 September 2019 11:14 AM
अँप डाउनलोड

मुंबई पोलीस व एटीएस'मधील वाद चव्हाट्यावर; आयुक्तांकडून 'त्या' अधिकाऱ्यांना अभय की?

Mumbai Police, Sanaj Barve, ATS, Devendra Fadnavis

मुंबई : मुंबई पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांच्यातील चढाओढ आणि वादविवाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. देवेन भरती यांनी एटीएस प्रमुख पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर या ठिकाणी बदलीसाठी थेट महासंचालकांकडे अर्ज करणाऱ्या मुंबई पोलीस दलातील १२ धडाकेबाज अधिकाऱ्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी नोटीस बॉम्ब टाकल्याने खळबळ माजली आहे. मुंबई पोलीस दल म्हटलं की पाहिलं डोळ्यासमोर येतं ते शिस्त, मात्र अधिकाऱ्यांनी अशाप्रकारे खुलेआम नियमांचे उल्लंघन करणे ही बाब पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी अत्यंत गंभीरपणे घेतल्याचे वृत्त आहे. त्यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी संबंधित १२ अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक दर्जाचे असे अधिकारी आहेत, ज्यांना मुंबईची खडानखडा आणि सखोल माहित आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था हाताळण्याचा अनुभव, गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याचे कौशल्य आणि दांडगा जनसंपर्क असल्याने तसे अधिकारी आपल्या पथकात असावेत असे प्रत्येक विभागप्रमुखाला वाटते. दरम्यान, १५ मे रोजी देवेन भरती यांची एटीएस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी १३ ते १४ अधिकाऱ्यांनी एटीएस’मध्ये काम करण्यास इच्छुक असल्याचे सांगत बदलीसाठी पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे बदलीसाठी विनंतीअर्ज केला. मात्र धक्कादायक म्हणजे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी मुंबई पोलीस आयुक्त्त संजय बर्वे यांना पूर्णपणे अंधारात ठेवले. सदर विषयाची माहिती मिळताच पोलीस आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यांची माहिती मागवली.

दरम्यान, बदलीचे अधिकार पोलीस संचालकांकडे असले तरी मुंबई पोलीस दलाचे प्रमुख या नियमानुसार सदर अर्ज पोलीस आयुक्तांमार्फत जाणे अपेक्षित होते. त्यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी संबंधित १२ अधिकाऱ्यांना नोटीस बजावत केलेल्या कृतीबद्दल लेखी जाब विचारला आहे. आपण केलेले कृत्य अत्यंत गंभीर असून आपल्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा आयुक्षतांनी सदर नोटीसमध्ये केल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस उपायुक्त (प्रशासन) नवल बजाज यांच्या स्वाक्षरीने सदर नोटीस धाडण्यात आली आहे. विशेष म्हणजे सदर नोटीसला लेखी स्वरूपात उत्तर देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना काल म्हणजे १३ जून पर्यंतची तारीख देण्यात आली होती. मिळालेल्या वृत्तानुसार सदर नोटीसला संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी उत्तर दिले आहे, मात्र त्यात नेमकं काय उत्तर देण्यात आलं आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सादर घटनेने पोलीस आयुक्त संपल्याचे वृत्त असून, संबंधित अधिकारी कारवाईमुळे धास्तावल्याचे वृत्त आहे.

अनुरूप मराठी वधू - वर मोफत ऑनलाईन नोंदणी

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(292)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या